छत्रपती शिवाजी महाराज चौक शिरपूर येथे जिवघेणा खड्डा
स्वराज्य संघटनेने बेशरमचे झाड लावून केला प्रशासनाचा निषेध
शिरपूर :
शिरपूर जैन येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक बस स्टॅन्ड परिसर येथे मागील अनेक दिवसांपासून जिवघेणा खड्डा असून स्थानिक नागरिकांच्या वतीने वारंवार स्थानिक प्रसानाच्या निदर्शनास सदर बाब आणून दिली परंतु स्थानिक प्रशासन या बाबीकडे दुर्लक्ष करीत आहे. या खड्या मध्ये अनेक दुचाकीस्वार पडून त्यांना इजा झालेल्या आहेत. तर खड्यातील चिखल उडाल्याचे कारणावरून अनेक वेळा किरकोळ वाद विवाद सुद्धा झालेले आहेत.
प्रशासन सदर खड्ड्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याने स्वराज्य संघटना प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांच्या आदेशानुसार आज दिनांक २९/०७/२०२३ रोजी शिरपूर जैन येथे स्वराज्य संघटनेच्या वतीने बेशरमचे झाड लावून व हार घालून सदर खड्डे दाखवण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक बस स्टॅन्ड परिसर येथील चौकातील हा खड्डा अनेक वर्षापासून तो असाच आहे. गावातून बस स्थानकावर येण्यासाठी हाच महत्वाचा रस्ता असल्याने वाहणाची जास्त रहदारी याच ठिकाणी आहे व या मुख्य ठिकाणी खड्डेच खड्डे पडले आहे. तरी हे खड्डे तात्काळ बुजल्या जावेत. या आशेने आज स्वराज्य संघटनेने वेगळ्या पद्धतीने शासनाला विकासाचे खड्डे दाखवले आहे. यावेळी स्वराज्य चे शिरपूर शहरातील संदीप देशमुख, बाळू जाधव, शेख तैसिफ सागवान, आतिश जाधव, योगेश शेजुळ, राम भंगी, राम देशमुख, ओमकार वाघ, तेजस मारवाडी, आकाश देशमुख, सौरभ धोंगडे, लखन वंजे, सचिन पांडव, ओंकार देशमुख, सोनू देशमुख,आदी मावळे शिलेदार उपस्थित होते.