ब्रेकिंग

चोरद फाटा ते चोरद रस्त्याची दुरावस्था ग्रामस्थांचे हाल संबंधिताचे दुर्लक्ष

0 0 6 5 9 0
[wonderplugin_carousel id="1"]


अनंता घुगे/मंगरुळपीर तालुका प्रतिनिधि/दिनांक/२१/०८/२०२३
शासन आणि रस्ता हे दोन्ही चालण्यासाठी बनवले आहेत. सरकार चालत आहे, पण अनेक ग्रामीण रस्त्यांची देखभालही होत नाही. गावातील खराब रस्त्यांवर जर लोकप्रतिनिधींनी व प्रशासनाने नजर ठेवली तर कदाचित त्यांनाही नवसंजीवनी मिळू शकेल. परिसरातील अनेक रस्त्यात खड़े पडले आहेत. मंगरुळपीर तालुक्यातील चोरद फाटा ते गावात जाणारा २ किलोमीटर पर्यंत असणारा रस्ता पूर्ण उखडल्याने रस्त्यावर खड्डे निर्माण झाल्याने प्रवाशांना त्रास होत आहे. या मार्गावर डांबरीकरण करण्याची मागणी केली जात आहे. परंतु, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. गावातील रस्त्यांचे सिमेंटीकरण किंवा डांबरीकरण केले जातात. परंतु, वर्षांनंतरही दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत. परिसरातील बहुतांश ग्रामीण रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवर खोल खड्डे पडल्याने रस्ते खडबडीत झाले आहेत.

रस्त्यांच्या दुतर्फाही उरलेल्या नाहीत. चोरद फाटा ते गावात जाणारा रस्ता उखडून अनेक वर्षे उलटून गेले. मात्र, त्यानंतर आजतागायत दुरुस्तीचे काम करण्यात आले नाही. चोरदकडे जाणारे दुचाकी किंवा चारचाकी, ट्रॅक्टर व ट्रक यांची नेहमी वर्दळ असते. रस्ता पूर्ण उखडल्याने वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. रस्त्यांची स्थिती फारच दयनीय झालेली आहे.त्यामुळे रस्त्याची स्थिती सुधारावी अशी मागणी केली जात आहे. परंतु याकडे लोकप्रतिनिधी व संबंधित प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप परिसरातील नागरिक करत आहेत. रस्ते हे विकासाची नाडी असतात. ग्रामीण भागातील रस्ते विकासासाठी अत्यंत उत्तम स्थितीत असणे अत्यावश्यक आहे. परंतु, नेमके या बाजूने विचार न करता त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. कित्येक दिवसांपासून ग्रामीण जनता या खराब रस्त्यावरून वावरत आहे. याचा मोठा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. मात्र, ग्रामीण रस्ते दुरुस्तीची प्रतीक्षा करत आहेत. ग्रामीण भागात कित्येक दिवसांपासून रस्त्यांचा विकासाकडे पाहिले जात नाही. एखाद्या ठराविक वेळी एखाद्या लोकप्रतिनिधीच्या पुढाकाराने रस्त्यास निधी मंजूर झाला तर मोठा गाजावाजा करतात. पत्रक काढतात, वर्तमानपत्रात बातमी छापून येतात. हे सर्व करून मोठी प्रसिद्धी केली जाते. निधीचे आकडेही लाखो-कोटीत असतात. मात्र, ही ग्रामीण रस्ते दुरुस्त करत असताना थातूरमातूर रस्त्यांची कामे केली जातात व नंतर सहा महिन्यातच रस्त्यांची दुर्दशा होते. असे थातूरमातूर रस्ते करण्यापेक्षा एकदाच संपूर्ण बजेटमध्ये रस्ते दर्जेदार करून दाखवले तर ग्रामीण भागाचा विकास होण्यास वेळ लागणार नाही. कित्येक वर्षांपासून ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मात्र, नागरिकांनी रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी अनेकदा केली. परंतु, त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केले जाते. सध्याच्या परिस्थितीत ग्रामीण भागातील जनता दैनंदिन जीवन जगत असताना या खराब रस्त्यामुळे त्यांचा विकास झाला नाही. त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. विविध पक्षांच्या राजकारणात ही गावे विकासापासून वंचित राहतात. मात्र, विकासासाठी ग्रामविकास खात्याने ग्रामीण भागातील रस्त्यांचा सर्वे करण्याचे आदेश द्यावेत. यामध्ये खरोखरच कोणत्या गावात रस्ते अथवा इतर सोयीसुविधांची खरोखरच गरज आहे हे पहावे व सर्वे करून ग्रामीण भागाचा विकास करावा. तेव्हा डिजिटल इंडियात ग्रामीण भागाचा विकास होईल .

चोरद ते चोरद फाटा हा गावातिल प्रमुख मार्ग आहे या रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य झाल्याने किरोकळ स्वरुपाचे अपघातात वाढ झाली आहे विद्यार्थी,रुग्न, वयोवृद्ध,व अत्यावश्यक सेवा देतांना सबंधीतांना अडचणी येतात पेशंटला तातडिची व्यवस्था होऊ शकत नाही खुप अडचणींचा सामणा करावा लागत असुन संबंधित विभागाने या रस्त्यावर नविन डांबरीकरन करुन सदरची समस्या दुर करावी हि मी गावकर्यांच्या वतिने मागणी करित आहो.
प्रमोद प्रकाशराव आंधळे
( तंटामुक्तीचे अध्यक्ष चोरद ता.मंगरुळपीर जिल्हा वाशिम)

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 5 9 0
[wonderplugin_carousel id="1"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे