आरोग्य व शिक्षणगुन्हेगारीदेश-विदेशमहाराष्ट्रसंपादकीय

शिरपुरातील रोड रोमियोचा बंदोबस्त करा!

0 0 6 5 7 3
[wonderplugin_carousel id="1"]


अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मागणी


शाळा व महाविध्यालय परिसरात दामिनी पथकाची गस्त वाढविण्याची केली विनंती


शिरपूर :


येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचीच्या वतीने ठाणेदार पोलीस स्टेशन शिरपूर यांना निवेदन देऊन शाळा व महाविध्यालय परिसरात दामिनी पथकाची गस्त वाढविणे व खेड्यावरून येणाच्या मुलींना संरक्षण पुरवावी अशी मागणी वजा विनंती केली आहे

निवेदनात नमूद आहे की, शिक्षण घेत असतांना शिक्षणाच्या दर्जा बरोबरच विध्यार्थ्यांना काही मुलभूत सुविधा मिळणे अपेक्षित आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हि जगातील सगळ्यात मोठी छात्र संगठन असून विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांचे निवारण करते. व अ.भा. विद्यार्थी परिषदे कडे शिरपूर येथील शाळा व महाविध्यालयात शिकणाऱ्या काही विध्यार्थ्यांनी तोंडी तक्रार दिली त्यानुसार शाळा महाविध्यालय भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत अनेक टवाळखोर मुले रस्त्यावर मुलींची छेड काढण्याच्या प्रयत्नांत असतात. शिरपूर येथे एकाम्बा आणि करंजी शेलगांव, दापुरी आदी गावातून मुली सायकल द्वारे शाळा महाविद्यालयात शिक्षणासाठी येत असतात. यावेळी काही अल्पवयीन मुले बिना नंबरची जोर जोरात मोटार सायकल घेऊन शाळेच्या वेळात इकडून तिकडे चकरा मारत असतात. तर काही चीडीमारी करण्याच्या उद्देशाने रस्त्याच्या मधोमध उभे राहून अलील कमेंट पास करतात. त्यामुळे मुलींना आपली इज्जत व जिव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

पुढे निवेदनात असे नमूद आहे की, पोलीस स्टेशन मार्फत गवळी कॉलेज ते एकाम्बा रोड, पोलीस स्टेशन मागील रस्ता ते गवळी कॉलेज, करंजी ते शिरपूर रोड, शेलगांव बगाडे दापुरी ते शिरपूर रोडवर शाळा महाविध्यालय भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी दामिनी पथकाची गस्त वाढवल्यास सर्व अनुचित प्रकाराला आळा बसेल व विद्यार्थिनी भयमुक्त वातावरणात शिक्षण घेतील.

तसेच निवेदनात नमूद आहे की, पोलीस स्टेशनमधील दामिनी पथकाचे कर्मचारी सवडी नुसार येऊन केवळ सेल्फी घेऊन वापस जातात, त्यांना शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळेत आपली जबाबदारी पार पाडण्या बाबत आदेशित करावे, जेणे करून टवाळ खोरांवर आळा बसेल व काहीही अनुचित प्रकार होणार नाही. कायद्याचे उल्लंघन करणारावर योग्य ती कारवाई करावी. अशी विनंती करण्यात आली असून निवेदनावर नगर मंत्री ओमकार वाघ यांची स्वाक्षरी असून निवेदन देतांना जिल्हा संयोजक सुमित बरांडे यांचे सह परिषदेचे पदाधिकारी उपस्थीत होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 5 7 3
[wonderplugin_carousel id="1"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे