ब्रेकिंग

बुधवारी मणिपूर घटनेच्या निषेधार्थ धिक्कार मोर्चा चे आयोजन

0 0 6 3 6 7
[wonderplugin_carousel id="1"]

वाशीम : ( दि. 24 जुलै )
मणिपूर मधील कुकी आदीवासी समाजातील दोन तरूणींची नग्नधिंड काढणाऱ्यांना कठोर शिक्षा करावी. तसेच याप्रकरणी नाकर्त्या मणिपूर राज्य सरकार व केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी दि. 26 जुलै रोजी वाशीम येथे सकाळी 11 वाजता समनक जनता पार्टी वाशीम जिल्ह्याच्या वतीने धिक्कार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
समनक जनता पार्टीच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या पत्रानुसार, मणिपुर राज्य गेल्या दोन महिन्यांपासून पेटला आहे. तेथील दोन समुदायातील संघर्ष अधिक वाढत आहे. तीथे असणार भाजप च सरकार ठोस भूमिका घेत नसल्याने तेथील संघर्ष अधिक वाढत आहे. खून, जाळपोळ, महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत. असे असतांना तेथील राज्य सरकार कारवाई करत नसल्याने त्यांची या घटनांना मूक संमती तर नाही ना अशी शंका निर्माण झाली आहे.
तेथील दोन महिलांची बलात्कार करुन नग्न धिंड काढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर समजमन ढवळून निघाले. कुकी आदीवासी समाजातील दोन तरूणींना नग्न करून ज्या पद्धतीने धिंड काढण्यात आली ते बघितल्यावर प्रत्येकाची मान शरमेने खाली गेली आहे. मणिपुर मध्ये अत्याचार करणाऱ्यांना व महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या गुन्हेगारांना तेथील सरकारने शासन न केल्यामुळे गुन्हेगारांचं धैर्य वाढलं आहे. मणिपुरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह हे तीथे घडणाऱ्या गुन्हयांवर नियंत्रण ठेवू शकले नाहीत.
त्यामुळे त्यांनी नैतिक जबाबदारी म्हणून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. तसेच देशात असलेल्या केंद्र सरकारने सुद्धा आपल्या पक्षाचे सरकार असलेल्या मणिपूर राज्य सरकारला कठोर कारवाई बाबत चुप्पी साधल्यामुळे प्रधानमंत्री यांनी सुद्धा राजीनामा द्यावा अशी मागणी या मोर्चाद्वारे केली जाणार आहे.
हा मोर्चा समनक जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष गजानन धामणे तसेच महिला आघाडी जिल्हाध्यक्ष शितलताई विष्णू राठोड यांच्या नेतृत्वात निघणार आहे. वाशीम शहरातील क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव स्मारक परिसरातून निघणार असून जिल्हाधिकारी कार्यालयावर समारोप होणार आहे. या मोर्चाला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. रामकृष्ण कालापाड, राष्ट्रीय नेते, प्रा. डॉ. अनिल राठोड, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख पी. एस. खंडारे, विभागीय महासचिव प्रा. अनिल बळी
यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
या मोर्चात संवेदनशील नागरिकांनी, सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समनक जनता पार्टीचे जिल्हा महासचिव सुधाकर राठोड, जिल्हा उपाध्यक्ष संजय वाणी, बाळासाहेब काळे, मंगरूळपीर, गजानन खानझोडे रिसोड, पुंडलिक लसनकुटे कारंजा, भागवत राजगुरू वाशीम, दत्तराव वानखडे, प्रचार प्रमुख केशवराज काळे, मंगरूळपीर शहराध्यक्ष विजय राठोड, ऍड. सेवेंद्र सोनोने, रवींद्र उर्फ राजू काळे, किरणताई तांदळे, मीराताई राठोड, संगीता मुसळे, संगीता राऊत, वंदना राठोड, मीना कांबळे, विमल आव्हाळे, सीमा राठोड, संगीता काळे, सीमा गंगावणे, स्नेहा देशमुख, स्वास्ती नायर, आशा गंगावणे, सुनीता जवळकर, शोभा महाले, मनीषा जळवकर आदींनी आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 3 6 7
[wonderplugin_carousel id="1"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे