ब्रेकिंग

केंद्रस्तरीय अधिकारी संजय सुरेकर यांचा मतदार नोंदणीच्या उत्कृष्ट कार्याबद्दल मा.जिल्हाधिकारी यांच्याकडून सन्मान

गतवर्षी देखील मा.जिल्हाधिकारी यांच्या हस्ते झाला होता सत्कार,प्रजासत्ताक दिनी गावकऱ्यांच्या वतीने देखील झाला सत्कार

0 0 6 4 9 2
[wonderplugin_carousel id="1"]

शिरपूर जैन-मतदार नोंदणी ,घरोघरी जाऊन प्रत्यक्ष मतदार सर्वेक्षण, मतदार यादी शुद्धीकरण ,संक्षिप्त पुनरीक्षण आदी विविध उत्कृष्ट कामाबाबत संजय सूरेकर (शिक्षक) यांचा मा.जिल्हाधिकारी श्रीमती भुवनेश्वरी एस .यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच किन्ही घोडमोड येथील गावकरी यांच्या वतीने प्रजासत्ताकदिनी त्यांचा सत्कार करण्यात आला.
येथून जवळच असलेल्या ग्राम किन्ही घोडमोड येथे पदवीधर शिक्षक यांनी नवमतदार,महिला ,पुरुष मतदार नोंदणी तसेच यादीतील दुरुस्ती करीत उत्कृष्ट भूमिका बजावली, गावात मतदारा च्या बाबतीत १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण केले,घरोघरी जाऊन मतदारांचे सर्वेक्षण,तसेच संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडत गावातील याबाबतचे १०० टक्के काम पूर्ण केले, त्यांच्या या कामाची दखल घेत जिल्हाधिकारी श्रीमती भुवनेश्वरी एस.यांनी प्रमाणपत्र देऊन त्यांचा आपल्या कार्यालयात सत्कार केला.शासनाने नेमून दिलेले काम चोखपणे करताना त्यांनी२१ जुलै ते २१ ऑगस्ट या दरम्यान घरोघरी जाऊन मतदान नोंदणी सर्वेक्षनाचे काम केले,त्यानंतर संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २७ ऑक्टोबर ते ९ डिसेंबर २०२३ या दरम्यान घेतले, तसेच गावात विशेष शिबिर घेऊन नवमतदार, तसेच महिला मतदार नोंदणीकरीता विविध अर्ज स्वीकारले.यासोबतच मतदार ओळखपत्राशी, आधार लिंक करण्याचे काम शंभर टक्के त्यांनी पूर्ण केले.किन्ही घोडमोड या गावात रॅलीद्वारे मतदारासाठी जनजागृती केली.सोबतच दिव्यांग मतदारांची देखील मतदार म्हणून नोंदणी केली.यामुळे तालुका व जिल्हा स्तरावरील विविध अधिकारी यांच्याकडून त्यांचे कौतुक करीत त्यांचा सन्मान केला.तसेच मतदार नोंदणी या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचा जिल्हाधिकारी श्रीमती भूवनेश्वरी एस.यांनी त्यांच्या हस्ते सुरेकर यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये नावे दुरुस्ती,, नावे वगळणे, मतदार यादी त्यांच्याकडून १०० टक्के शुद्धीकरण करण्यात आली.या उत्कृष्ट कार्याबद्दल संजय सुरेकर (शिक्षक) यांचा सत्कार जिल्हाधिकारी कार्यालयात श्रीमती भुवनेश्वरी एस.जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पार पडला, यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हाधिकारी निवडणूक विभाग कैलास देवरे,यांच्या उपस्थितीत त्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.सुरेकर यांनी किन्ही घोडमोड येथे घरोघरी जाऊन ३९३ मतदाराच्या नावांची व इतर दुरुस्ती केली, नव मतदार म्हणून ५३ नोंदणी, नावे वगळणे १४ केले, नंतर संक्षिप्त पुनरीक्षण मध्ये नव मतदार नोंदणी ११ तर दुरुस्ती १५७ ,दिव्यांग नोंद १२, सोबतच नवीन कार्ड हरविले, गहाळ झाले ३०.असे एकूण १९९ मतदारांची दुरुस्ती त्यांनी केली.त्यांच्या या उत्कृष्ट कार्याची पावती म्हणून गावकऱ्यांचे कर्तव्य पार पडताना प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी देखील त्यांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी गावाचे सरपंच सुनील घोडमोडे, विजय घोडे उपसरपंच,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सतीश कांबळे, तलाठी ना.ना. इढोळे, ग्रामपंचायत सदस्य विनोद घोडमोडे,नंदुभाऊ जाधव, माजी सरपंच चंदूभाऊ घोडे, तंटामुक्ती अध्यक्ष रमेश घोडे, पोलीस पाटील राहुल कांबळे, ग्रामसेवक किशोर खरपास ,सुरेश जाधव ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते ,यांच्यासह यावेळी शाळेतील मुख्याध्यापक बळकर सर,शिक्षक नारायण काळे, दिवटे मॅडम हे देखील हजर होते. या सोबतच इतर गावकऱ्यांची देखील मोठ्या संख्येने उपस्थिती होती.संजय सुरेकर हे पदवीधर शिक्षक असून सध्या किन्ही घोडमोड येथे कार्यरत आहेत.ना ना.इढोळे तलाठी यांचे नियमित सहकार्य लाभते असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच ते नेहमीच आपल्या शाळेंतर्गत विविध कार्यक्रम घेऊन देखील सदैव विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत राहतात सोबतच गावकऱ्यांसाठी ते नेहमीच विविध लोकोपयोगी,जनजागृती चे कार्य करण्यासाठी देखील सदैव अग्रेसर असतात.त्यांचा सत्कार ही गावासाठी गौरवाची बाब असल्याचे गावकरी सांगतात.

1/5 - (1 vote)

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 4 9 2
[wonderplugin_carousel id="1"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे