श्रीराम वाढे यांची सैन्य दलात निवड
गावकऱ्यांनी केले निवडीचे स्वागत, शुभेच्छाचा वर्षाव
शिरपूर जैन येथील श्रीराम सयाजी वाढे यांनी सैन्य विभागाच्या मार्फत मागील काही महिन्यांपूर्वी झालेल्या अग्निवीर पदाच्या पात्र ते करिता लागणाऱ्या सर्व परीक्षा कठोर परिश्रम करून पास केल्या, त्यांची सैन्य दलात निवड झाली असून नुकतेच सदर जवान आपले ट्रेनिंग संपवून काही दिवसांच्या सुट्टी मध्ये आपल्या गावी शिरपूर जैन येथे आले असता गावातील त्यांचे मित्र मंडळी तथा सामाजिक कार्यकर्ते अनंत ताकतोडे, माजी उपसरपंच अस्लम परसुवाले व मित्र मंडळ यांनी शाल श्रीफळ देऊन स्वागत केले. व पुढील वाटचाली करिता शुभेच्या दिल्या.
श्रीराम वाढे यांचे वडील ऑटो रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, तर कुटुंबातील सदस्य रोज मजुरी करतात अशाही परिस्थितीत श्रीराम याने सैन्य दलात भरती होण्याच्या जिद्दीने कठोर परिश्रम केले व सैन्यात भरती झाला आपल्या यशाचे श्रेय त्याने आई वडील व आजोबा यांना दिले. श्रीराम याच्या सैन्य दलात भर्ती होण्यामुळे शिरपूर येथून सर्वच स्तरावरून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.