28.4 C
मालेगाव
August 3, 2020
Home » मराठी पत्रकार परिषदेच्या तालुका संघटक पदि प्रसाद पाठक
Uncategorized

मराठी पत्रकार परिषदेच्या तालुका संघटक पदि प्रसाद पाठक

मालेगाव ता .2 -मेडशी येथील पत्रकार प्रसाद पाठक यांची तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे .आज ता 2 रोजी त्यांना नियुक्ती पत्र तालुका मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष प्रा अरविंद गाभणे यांनी नियुक्तीपत्र दिले

यावेळी प्रा गाभणे म्हणाले की प्रसाद पाठक त्यांचे वडील प्रदीप पाठक यांच्या कडून त्यांनी पत्रकारितेचा वसा घेतला आहे .नियुक्ती नंतर बोलताना पाठक म्हणाले की अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदे ही पत्रकारांची मातृ संघटना आहे .अश्या संघटनेत काम करण्याची संधीमिळत असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले तसेच तालुक्यात संघटना मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला

यावेळी तालुका मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष प्रा अरविंद गाभणे , जिल्ह्या कार्यकारिणी सदस्य यशवंतराव हिवाराळे, शेखअनिस बागवान ,प्रशांत लोखंडे , गोरखनाथ भागवत , विठ्ठल भागवत , प्रसाद पाठक , चंद्रकांत गायकवाड ,जावेद भवानीवाले आदी मराठी पत्रकार परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते

या बातम्या वाचा

Leave a Comment