28.4 C
मालेगाव
August 3, 2020
Home » लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०० व्या जयंती निमित्त निबंध व वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन..
Uncategorized

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०० व्या जयंती निमित्त निबंध व वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन..

जीवन आधार फौंडेशन रेस्क्यू फोर्स महाराष्ट्र राज्यचे औरंगाबाद (संभाजीनगर) जिल्हा अध्यक्ष विजय कमलेकर तसेच रावणराज प्रतिष्ठान चे अनिल भाऊ कुऱ्हाडे यांच्या वतीने  लोकशाहीर अण्णा साठे यांच्या १०० व्या जयंती निमित्त निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेसाठी १५० च्या हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून ह्या स्पर्धेच्या माध्यमातून सहभागी विद्यार्थ्यांना कोरोनाच्या लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर डिजिटल प्रमाणपत्र देऊन गौवरविण्यात आले व स्पर्धा विजेत्यांना आकर्षक बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त डिजिटल पद्धतीने साजरी करण्यासाठी मार्गदर्शन व साह्यता देणारे आमच्या संस्थेचे जीवन आधार फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष शंकर दादा पवार,जीवन आधार फाउंडेशन कोकण प्रांत अध्यक्ष कु मनिषा ताई चोनकर व औदुंबर देवडकर पाटील, मनोज दादा तरकसे, सचिन भाऊ दातार यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी मोलाचे सहकार्य केले. तर अनिल कुऱ्हाडे संस्थापक अध्यक्ष-रावणराज प्रतिष्ठान,विजय कमलेकर जिल्हाध्यक्ष–जीवन आधार फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आणि औदुंबर देवडकर पाटील युवामंच संभाजीनगर,मनोज दादा युवा मंच रांजणगाव, सचिन दादा युवामंच,सिद्धू जोगदंड,सोशल मीडिया गुलाब मोहिते पर्यवेक्षक, कृष्णा साळवे,सोशल मीडिया यांनी परिश्रम घेतले.

या बातम्या वाचा

Leave a Comment