28.4 C
मालेगाव
August 3, 2020
Home » कर्मचाऱ्यांनी प्रामाणीकपणे कार्य करावे.. महसुल दिनाच्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी राऊत ।
Uncategorized

कर्मचाऱ्यांनी प्रामाणीकपणे कार्य करावे.. महसुल दिनाच्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी राऊत ।

जामनेर ता,प्रतिनिधी: – संतोष पांढरे

काळ बदलत चालला आहे, तस-तशा वेगाने काम करण्याच्या पद्धतीमधेही बदल होत आहे,परंपरागत पध्दतीबरोबरच अत्याधुनीक सुवीधाही उपलब्ध होत आहेत,त्यासाठी आपण सर्वांनी प्रामाणीकपणे कार्य करणे गरजेचे असल्याचे मत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केले.
काल दीं.१ रोजी सायंकाळी तहसिलआवारात “महसुल दिन” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,त्यावेळी श्री राऊत बोलत होते.व्यासपिठावर प्रान्तधिकारी दिपमाला चौरे,तहसिलदार अरूण शेवाळे आदी होते.
याप्रसंगी उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या महसुल कर्मचाऱ्यांना सन्मानपत्र-गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.यानंतर पळासखेडा ता जामनेर येथे एकत्रीतरीत्या सुरू करण्यात आलेल्या २०० खाटांच्या सुवीधेचे उदघाटन करण्यात आले.दरम्यान पालीकेच्या कोरोना प्रादुर्भाव जनजागृतीद्वारा धडक कारवाईसह संसर्ग लागण रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या वाहनाला जिल्हाधिकारी राऊत व ईतर मान्यवरांनी हिरवी झेंडा दाखविला.कार्यक्रमाला मुख्याधिकारी राहुल पाटील, नायबतहसिलदार सुभाष कुंभार,ए डी हिरे,तलाठी प्रशांत हागवणे पाटील,व्ही एस पाटील,एम डी पाटील, रमेश हिरे,संदीप काळे,मनोज वाल्हे,शिपाई जगताप आदी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

या बातम्या वाचा

Leave a Comment