28.4 C
मालेगाव
August 3, 2020
Home » अकोट शहरात आज २ बाधितांची भर, तर एकाचा मृत्यू
Uncategorized

अकोट शहरात आज २ बाधितांची भर, तर एकाचा मृत्यू

अकोट प्रतिनिधी:

अकोटमध्ये करोना व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. करोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या नागरिकांच्या संख्येत वाढ होत आहे. शनिवारी पुन्हा एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने आजवर तब्बल १४ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.तालुक्यात दररोज कोरोनामुळे होणारे मृत्यू चिंता वाढवणारे असून ,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे
आज सायंकाळ पर्यंत आलेल्या अहवालानुसार अकोट शहरात २ जण कोरोना बाधित झाले असून त्यापैकी अकबरी प्लॉट येथील २० वर्षीय तरूणीला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे, तर एका बधिताबद्दल ची माहिती वृत्त लिहेस्तोवर प्रशासनाकडून उपलब्ध होऊ शकली नाही,

दरम्यान आज अंबिका लेआऊट येथील ७२ वर्षीय प्रसिद्ध अडत व्यावसायिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे, त्यामुळे अकोट तालुक्यात सध्या कोरोना मुळे एकूण बाधितांची संख्या ही आता २३५ झाली असून ,१४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू तर ८४ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे,

कंटेन्मेंट झोन चा कालावधी २८ दिवसा ऐवजी १४ दिवस

राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने, कंटेन्मेंट झोन ची निर्मिती मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती, यामुळे गस्तीवर असलेल्या पोलिसांवर मोठा भार आला होता. प्रशासन आणि पोलिसांवरील भार कमी करण्यासाठी कंटेन्मेंट झोनचा कालावधी १४ दिवसांवर आणावा, अशी मागणी राज्य शासनाने केंद्राकडे केली होती,
अखेर याबाबत सुधारित नियमावली जाहीर करत
रुग्ण आढळल्यास तो भाग २८ दिवसा एवजी १४ दिवसच प्रतिबंधित करण्यात येणार असल्याची सूचना राज्य शासनाला दिली आहे

या बातम्या वाचा

Leave a Comment