28.4 C
मालेगाव
August 3, 2020
Home » १०० टक्के निकालाची १४ वर्षांपासून परंपरा !
Uncategorized

१०० टक्के निकालाची १४ वर्षांपासून परंपरा !

वाड्यातील लिटिल एंजल्स इंग्लिश स्कुलची गरुडझेप

वाडा:प्रतिनिधी

श्री साई जनकल्याण संस्था वाडा यांच्या मार्फत १९९९ साली लिटिल एंजल्स इंग्लिश मिडीयम स्कुलची स्थापना करण्यात आली अगदी सुरुवातीला २९ विद्यार्थ्यांनी सुरू झालेली ही शाळा आज जवळपास दोन ते अडीच हजार विद्यार्थी संख्येवर पोहोचली असून सलग १४ वर्षांपासून या शाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागत आहे.

बुधवारी जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात १०० टक्के उत्तीर्ण विद्यार्थ्यांची हीच परंपरा कायम ठेवत दहावीच्या शर्वरी सचिन पाटील या विद्यार्थिनीला ९६.६०%, ईशा सुनील बाविस्कर हिला ९६.४०% तर दिशा रवींद्र पाटील हिला ९५.४०% इतके भरभरून गुण मिळाले आहेत. शैक्षणिक दर्जा या शाळेचा अतिशय उच्च असून प्रत्येक विद्यार्थ्यांवर येथे बारीक लक्ष दिले जाते ज्यासाठी या शाळेत तज्ञ शिक्षकवर्ग आहे.
लिटिल एंजल्स शाळेचे सामाजिक कार्य देखील मोठे असून जवळपास शंभराहून अधिक विद्यार्थ्यांना शाळेने दत्तक घेऊन त्यांना मोफत शिक्षण देण्याचे कार्य केले आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागांतील शाळांना मोफत पाठ्यपुस्तके , दप्तरे व शैक्षणिक साहित्यांचे मोठ्या प्रमाणात वाटप आजवर करण्यात आलेले आहे. आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर या याचबरोबर गरजू व्यक्तींना आर्थिक मदत सुद्धा शाळेच्या वतीने वेळोवेळी करण्यात येते गेल्यावर्षी सांगली – कोल्हापूर येथे आलेल्या महापुरात असंख्य लोकांचे नुकसान झाले यावेळी शाळेने मोफत वह्या, पुस्तक व इतर शालेय साहित्य व मोठ्या प्रमाणावर पाठवले होते.
संस्थेचे कार्य व शैक्षणिक दर्जा बघून संस्थेने वाडा व विक्रमगड अशा दोन शाखा चालू केल्या असून जेथे नर्सरी ते दहावीपर्यंत वर्ग सुरू आहेत. वाडा विक्रमगड या दोन शाखांमध्ये जवळपास 100 हून अधिक शिक्षक व इतर कर्मचारी काम करतात ज्यातून रोजगार देण्याचे महत्त्वपूर्ण काम देखील संस्थेने केले आहे. सलग १४वर्षे १००% निकाल देणे ही सोपी गोष्ट नसून ही किमया लिटिल एंजल्स इंग्लिश मिडियम स्कूलने करून दाखवली आहे. या यशाच्या परंपरेबरोबरच विद्यार्थ्यांसाठी नियमित मार्गदर्शन वर्ग तसेच विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व्हावा याच अनुषंगाने शाळा नेहमी प्रयत्नशील राहिले आहे.
गेल्या काही वर्षापासून जर आपण बघितलं तर पालघर जिल्ह्यामध्ये अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत पण वाडा तालुक्यातील एका ग्रामीण भागांमध्ये तब्बल 21 वर्षांपासून या शाळेने आपले नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले आहे हे कौतुकास्पद आहे. श्री साई जनकल्याण संस्था व स्कूल चे चेअरमन देवेंद्र रघुनाथ भानुशाली यांचे यात फार मोठे योगदान असून शाळेचा उत्तम निकाल व दर्जा राखण्यात शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा विशेष सहभाग आहे असे चेअरमन भानुशाली अभिमानाने सांगतात.

या बातम्या वाचा

Leave a Comment