28.4 C
मालेगाव
August 3, 2020
Home » श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी होणारी धारगड यात्रा रद्द
Uncategorized

श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी होणारी धारगड यात्रा रद्द

अकोट प्रतिनिधी:नितीन तेलगोटे

श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी १० आॅगस्टला मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित गाभा क्षेत्रात होणारी धारगड येथील महादेवाची भव्य यात्रा कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यात्रा रद्द करण्याचा निर्णय मा.तहसीलदार चिखलदरा यांनी घेतला आहे,
महाराष्ट्रात कोरोना(कोविड-१९) विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा रुग्ण आढळून येत आहेत. सदर विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता शासनाने विविध उपाय योजना राबविण्याबाबत निर्देश दिले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी राज्यात सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, क्रीडाविषयक कार्यक्रमांना पुढील आदेश होईपर्यंत परवानगी रद्द करण्याची सूचना देण्यात आल्या असून. साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ व संदर्भीय क्र. ६ नुसार संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये संचारबंदी घोषित केली आहे.तसेच आठवड्यातील शुक्रवारी सायं. ७ वाजता पासून ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यामध्ये जनता कर्फ्यु घोषित करण्यात आलेला आहे. तसेच पर्यटन स्थळी नागरिकांनी गर्दी करू नये अन्यथा फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याबाबत निर्देशित केलेले आहे.
त्यामुळे मौजा धारगड ता. चिखलदरा येथील प्राचीन शिव मंदिर येथे भरण्यात येणाऱ्या यात्रेत अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व इतर जिल्ह्यातून अंदाजे २० ते २५ हजार भाविक दर्शनाकरीता पायी तसेच दुचाकी / चारचाकी वाहनाने धारगड येथे येत असतात. ही यात्रा श्रावण मासातील तिसऱ्या रविवारी व सोमवारी दिनांक :- ०९/०८/२०२० व दिनांक:- १०/०८/२०२० रोजी येणार आहे. परंतु सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यामुळे यात्रेमध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व इतर जिल्ह्यातून (रेड झोन मधून) मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी पायी तसेच दुचाकी व चारचाकी वाहनाने धारगड येथे आल्यास सदर विषाणूचा प्रादुर्भाव पसरण्याची दाट शक्यता आहे. तसेच चिखलदरा तालुका मध्ये सुद्धा कोविड-१९ चे रुग्ण आढळून आलेले आहेत. सदर महामारीमुळे देशातील तसेच राज्यातील मोठ्या यात्रा सुद्धा रद्द करण्यात आल्या आहेत.त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिनांक:- ०९ ऑगस्ट व १० ऑगस्ट रोजी होणारी श्री. क्षेत्र धारगड येथील यात्रा रद्द करण्याबाबतचे आदेश करण्यास विनंती केली आहे.
करिता मा. जिल्हाधिकारी अमरावती यांचेकडील आदेशान्वये जिल्यातील सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना या तहसिल कार्यालयास प्राप्त झाल्या असून . त्यानुसार मौजा धारगड ता. चिखलदरा येथील प्राचिन शिव मंदिर येथे श्रावण महिन्यातील तिसऱ्या रविवारी व सोमवार रोजी आयोजित यात्रा/धार्मिक कार्यक्रम करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे,

या बातम्या वाचा

Leave a Comment