28.4 C
मालेगाव
August 3, 2020
Home » 1 ऑगस्ट ला भाजपा ने केले महाएल्गार सोशल डिस्टिंसिंग चे नियम पाळून मुळावा येथे आंदोलन !
Uncategorized

1 ऑगस्ट ला भाजपा ने केले महाएल्गार सोशल डिस्टिंसिंग चे नियम पाळून मुळावा येथे आंदोलन !


दुधाला दरवाढ आणि विजदरात कपातीच्या मागणीसाठी शासकीय नियम पाळून भाजपा मुळावा येथे रस्त्यावर उतरले…


Activ news/Umarkhed
Gajanan Wankhede Taluka Reporter Umarkhed.mob.9096746518.
Date.01.08.2020.

यवतमाळ : महाविकास आघाडी सरकारच्या जुजबी धोरणाविरुद्ध भारतीय जनता पार्टी ने आज एल्गार केला. 1 ऑगस्ट रोजी भाजपा कार्यकर्ते रस्त्यावर उतरले दुधाला दरवाढ द्या, विजेचे दर कमी करा आणि मुबलक प्रमाणात युरिया उपलब्ध करून द्या ! या मागणीसाठी मुळावा येथे रस्त्यावर दुध ओतून आंदोलन करण्यात आले असून जिल्ह्यातील सर्व सोळाही तालुक्यात व पाच शहर मंडळात 60 पेक्षा अधीक ठिकाणी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी प्रसिद्धी पत्रकातून सांगितले आहे.
आघाडी सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि अपेक्षित उपाययोजना नसल्यामुळे सामान्य माणूस कोलमडून पडला आहे. दुधाला भाव नाही आणि विजबिलाची बेभाव वसुली यामुळे सर्वसामान्य माणूस मेटाकुटीस आला आहे, या पार्श्वभुमीवर भारतीय जनता पार्टी दूध दरवाढ झाली पाहिजे आणि विद्युत दरवाढ कमी झाली पाहिजे याचबरोबर शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात युरिया मिळाला पाहिजे
या प्रमुख तीन मागण्या घेवून मुळावा येथे आज रस्त्यावर उतरले .
महाविकास आघाडी सरकारने कोरोनाच्या संकटाच्या काळात सर्व जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. जनतेला राज्य सरकारने काहीच मदत केली नाही. शेतकरीही अडचणीत आहे.
मा. देवेंद्रजी फडणवीस सरकारच्या काळात दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान व दूध भुकटी निर्यातीला अनुदान दिले गेले आता तर दुधाचे दर त्यापेक्षाही खालावले आहे.
विद्युत दरवाढ ही मोठ्या प्रमाणात होत आहे. कोरोना काळात तीन महिने आम्ही बिल देणार नाही, सरासरी बिल देऊ असे सांगून आता मोठ्या प्रमाणात बिल देण्यात येत आहे व त्यामध्ये दरवाढ,व भरमसाठ व्याज आकारणी सुद्धा केली आहे ही दरवाढ कमी व्हावी यासाठी मुळावा येथे आंदोलन करण्यात आले आहे.
आंदोलन प्रसंगी भाऊराव पाटील, सुभाष पुलाते, रमेश चंद्रवंशी, रामभाऊ पाठक,बाळू ठाकरे,राजेश चव्हाण,प्रविण पावडे,रामू पत्रे, स्वप्नील पाठक, गजानन वानखेडे,संदीप कदम,राजू चव्हाण,प्रविण पावडे, राजेश जकाते,शुभम सौंदनकर, बापूसाहेब भौरे,संजय देशमुख,बंडू कदम, ओमप्रकाश काळसरे, पंजाबराव चव्हाण,ज्ञानेश्वर जाधव, नागोराव खंदारे,शाम जाधव, तुकाराम कांबळे आदी कार्यकर्त्यांनी मुळाला येथे उपस्थित राहून निषेध व्यक्त केला.
शेतकऱ्यांना युरिया मुबलक प्रमाणात देण्यात यावा. कोरोना डिस्टिंसिंगचे पालन करून कोरोना करिता केंद्र शासनाने घालुन दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून हे आंदोलन करण्यात आले.

Gajanan Wankhede/Umarkhed.

या बातम्या वाचा

Leave a Comment