28.4 C
मालेगाव
August 3, 2020
Home » चाकूर येथे भारतीय जनता पक्षाचे रास्ता रोको
Uncategorized

चाकूर येथे भारतीय जनता पक्षाचे रास्ता रोको

भारतीय जनता पक्षाच्या वतीने चाकूर येथे शेतकऱ्यांच्या विविध समस्येबाबत रास्ता रोको आंदोलन

ACTIVE POLICE TIMES/LATUR
प्रभाकर वागलगावे – चाकूर तालुका प्रतिनिधी
७३८५७३४२४४.
दि.०१/०८/२०२०.

चाकूर येथे आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध समस्येबाबत शासनाला जागे करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
राज्य सरकार वेळोवेळी शेतकऱ्यांच्या समस्यांना दुर्लक्ष करीत आहे.”अशा सरकार चा जाहीर निषेध असो” अशा घोषणा देत चाकूर येथील मुख्य रस्त्यावर तालुका अध्यक्ष शिवाजीराव बैनगीरे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.शेतकऱ्यांच्या दूधाला प्रति लीटर १०रू. व दूध पावडर ला प्रति किलो ५०रू. अनुदान शासनाने द्यावे.अशा मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.शासनाने जर लवकरात-लवकर यासंबंधी निर्णय घेतला नाही,तर भविष्यात यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. असा इशारा तालुका अध्यक्ष शिवाजीराव बैनगीरे यांनी दिले आहे.
या आंदोनामध्ये तालुका अध्यक्ष शिवाजीराव बैनगीरे, बालाजी पाटील चाकूरकर, वसंतराव डिगोळे, अशोकराव चिंते, समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे, प्रशांत बिबराळे, श्रिकांत पोटे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभागी झाले होते.
यावेळी पोलीस प्रशासनाने कलम ६८ व ६९ नुसार कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली व नंतर सोडून देण्यात आले.

PRABHAKAR WAGALGAVE/CHAKUR.

या बातम्या वाचा

Leave a Comment