26.3 C
मालेगाव
August 4, 2020
Home » जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आडगाव बुद्रुक रिटेलच्या विद्यार्थिनींची उंच भरारी
Uncategorized

जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आडगाव बुद्रुक रिटेलच्या विद्यार्थिनींची उंच भरारी

ॲक्टिव न्यूज तेल्हारा

निलेश बहाड -:अकोट तेल्हारा प्रतिनिधी

मो -:9372092341

दिनांक-:///30/07/2020

नुकत्याच जाहीर झालेल्या 2020 च्या वर्ग 10 वी च्या परीक्षेच्या निकालांमध्ये जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अडगाव बुद्रुक. येथील रिटेल विषयाची विद्यार्थिनी कुमारी साक्षी राजेंद्र तायडे हिने 96 % गुण मिळवून शाळेतून प्रथम येण्याचा तसेच व रिटेल विषयामध्ये १०० गुण मिळवून अमरावती विभागातून प्रथम येण्याचा तसेच कुमारी माधुरी दशरथ सोळंके हिने 93 % गुण मिळवून शाळेमधून द्वितीय येण्याचा व विषयामध्ये १०० गुण मिळवून अमरावती विभागातून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. तसेच वर्ग दहावीच्या रिटेल विषयाच्या सात विद्यार्थिनींनी रिटेल विषयामध्ये 100 पैकी 100 गुण मिळवून अमरावती विभागांमधून प्रथम येऊन नेत्रदीपक यश मिळविले आहे. विद्यार्थिनीला मिळालेल्या या नेत्रदीपक यशाचे संपूर्ण गावामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये कौतुक होत आहे. रिटेल विषयांमध्ये उत्कृष्ट निकालाची परंपरा देणारी महाराष्ट्रातील एकमेव शाळा म्हणून जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अडगाव बुद्रुक या शाळेचे नाव होत आहे. या वर्षी वर्ग बारावीच्या रिटेल विषयांमध्ये सुद्धा महाराष्ट्रातून प्रथम येण्याचा मान याच महाविद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी नेहल चतुरसिंह बैस हिला मिळाला आहे. त्यामुळे या जिल्हा परिषद विद्यालयाचे व विद्यार्थ्यांना यशस्वी व्यवसाय शिक्षण देणारे व त्यांच्या यशामध्ये मोलाचा वाटा असणारे रिटेल व्यवसाय शिक्षक प्राध्यापक अभिजित लोखंडे सरांचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कौतुक होत आहे. तसेच जिल्हा परिषद विद्यालयांमध्ये काही विषयाला शिक्षक नसताना सुद्धा महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय प्राध्यापक श्री रवींद्र जाधव सर तसेच श्री दिलीप इंगळे सर व अभिजीत लोखंडे सर व इतर शिक्षकांनी विषय शिक्षक नसलेल्या विषयाचे एक्स्ट्रा क्लासेस घेऊन तसेच विद्यार्थ्यांना त्याबद्दल योग्य मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान नाहे व्हाव यासाठी विशेष प्रयत्न केले. 2015 पासून विद्यालयामध्ये सुरू करण्यात आलेल्या व्यवसाय शिक्षणाच्या रिटेल व हेल्थ केअर या विषयामुळे विद्यार्थी व्यवसाय शिक्षण तसेच रोजगाराभिमुख शिक्षण देऊन त्यांना रोजगार प्राप्त करून देण्यासाठी शाळेतील व्यवसाय शिक्षक प्रा. अभिजीत लोखंडी सर प्रयत्न करीत आहे. व्यवसाय शिक्षण रिटेल हेल्थ केअर मुळे विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेकडे कल दर्शवित आहे. सदर यशाचे श्रेय विद्यार्थी शाळेचे प्राचार्य सन्माननीय प्राध्यापक रवींद्र जाधव सर, व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विलास वानखडे ज्येष्ठ शिक्षक श्री अनिल गावंडे सर, विद्यार्थ्यांचे लाडके श्री दिलीप इंगळे सर, रिटेल व्यवसाय शिक्षक प्राध्यापक अभिजित लोखंडे सर, दखणे मॅडम, तसेच सर्व शिक्षक व शिक्षके तर कर्मचाऱ्यांना व आपल्या आई वडिलांना देतात.

nilesh bahal telhara

या बातम्या वाचा

Leave a Comment