28.4 C
मालेगाव
August 3, 2020
Home » स्मरणीय उपक्रमाने कारगिल शहिदांना कारंजा येथे श्रद्धांजली !
Uncategorized

स्मरणीय उपक्रमाने कारगिल शहिदांना कारंजा येथे श्रद्धांजली !

कारंजा येथील माजी सैनिक संघटना तर्फे कारगिल विजय दिवस निमित्त कारगिल युद्धात बलिदान दिलेल्या शहिदांना श्रद्धांजली अर्पण करून व वृक्षारोपणाने कार्यक्रमाची सांगता

ACTIVE NEWS/26जुलै2020
एकनाथ पवार ता.प्र.कारंजा लाड


येथील माजी सैनिक संघटने तर्फे 26 जुलै 2020 रोजी सकाळी दहा वाजता कारंजातील देवांगण कॉलनी येथील हुतात्मा स्मारक येथे,कारगिल दिवस निमित्त कारगिल युद्धात बलिदान दिलेल्या शहीदांना पुष्पचक्र वाहून सर्व माजी सैनिक संघटनेतील सदस्यांतर्फे श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी माजी सैनिक संघटना चे अध्यक्ष अतुल एक घरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व माजी सैनिक पदाधिकारी व त्यांना खांद्याला खांदा देणार्या त्यांच्यअर्धांगिनी सह परिवारातील सदस्य उपस्थित होते. यावेळी शहिदांना श्रद्धांजली अर्पण करून भारत माता की जय, वंदे मातरम् असे जयघोष करून सर्व शहिदांना मानवंदना देऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याच अनुषंगाने सर्व माजी सैनिक व त्यांच्या पत्नी सह परिवारासह विविध प्रकारच्या प्रजातीच्या झाडांचे वृक्षरोपण करून या झाडाचे संगोपन करण्याची सर्वांनी शपथ घेतली. माजी सैनिक संघटना चे अध्यक्ष श्री अतुल एक घरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले

या बातम्या वाचा

1 comment

Leave a Comment