28.4 C
मालेगाव
August 3, 2020
Home » शासकीय आदेशानुसार नागपंचमी निमित्त कारंजातील सर्व मंदिर बंद भाविक मंडळांनी घेतले बाहेरूनच दर्शन
Uncategorized

शासकीय आदेशानुसार नागपंचमी निमित्त कारंजातील सर्व मंदिर बंद भाविक मंडळांनी घेतले बाहेरूनच दर्शन

Active News/24 जुलै2020
एकनाथ पवार ता.प्र.कारंजा लाड

श्रावण महीन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी हा सण दरवर्षी मोठ्या उल्हासाने साजरा करतात. परंतु या वर्षी कोरोना प्रकोप व लाकडाऊन च्या नियमानुसार नागपंचमी निमित्त कारंजातील सर्व मंदिर बंद असता सर्व भाविकांमध्ये नाराजीचे सूर निघत असता नागोबा मंदिर चे बाहेरूनच दर्शन घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. यामध्ये विशेषकरून माळीपुरा ,नागोबा मंदिर, सिद्धेश्वर मंदिर लोकमान्य नगर ,नागोबा मंदिर रंगारी पुरा ,निळकंठेश्वर मंदिर हटोटी पुरा ,खोलेश्वर मंदिर ऋषी तलावपरिसर ,शिवानम. मठ दसरा मैदान ,नागनाथ मंदिर वाणी पुरा ,तसेच निसर्गरम्य नागठाणा परिसर व कारंजातील इ. नागदेवतेचे सर्व मंदिर बंद असल्यामुळे भाविकांना बाहेरूनच दर्शन घ्यावे लागले दर्शन न झाल्यामुळे भाविकांनी खंत व्यक्त केली. शासनाच्या नियमानुसार तोंडाला मास्क लावणे, सोशल डिस्टंस इ. चे पालन करून बाहेरूनच दर्शन घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले

या बातम्या वाचा