25 C
मालेगाव
August 4, 2020
Home » दलीत समाजावरील अन्यायाया बाबत शासनाने गंभीर पाऊले उचलावी, याबाबत म्हसवड पोलीसांना निवेदन
Uncategorized

दलीत समाजावरील अन्यायाया बाबत शासनाने गंभीर पाऊले उचलावी, याबाबत म्हसवड पोलीसांना निवेदन

ACTIVE NEWS/ सातारा
आकाश जगदाळे – सातारा जिल्हा प्रतिनिधी
७०३०२०१११८
दिनांक :- ११/७/२०२०

दलीत समाजावरील अन्यायाया बाबत शासनाने गंभीर पाऊले उचलावी, असे निवेदन,रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद यांच्या वतीने म्हसवड पोलीस स्टेशन येथे  देण्यात आले .मा. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या सुचनेनुसार रिपब्लिकन पार्टी कार्यकर्त्यांनी राज्यभर आंदोलने करण्याचा इशारा दिला आहे.
दलित समाजावर होणारे हल्ले याबाबत महाराष्ट्र शासन निष्क्रिय असून महाराष्ट्र शासनाने दलित समाजातील लोकांवर हल्ले करणाऱ्या व्यक्तीने कठोर शासन करावे अशा मागणीचे निवेदन नुकतेच म्हसवड पोलीस स्टेशन यांना देण्यात आलेले आहे.
या वेळी आरपीआय जिल्हाउपाध्यक्ष कीशोरभाऊ सोनवणे,सचिन बनसोडे पिंटु सोनवणे ,बापू सदाफुले रामभाऊ सोनवणे पपु शिंदे सूर्यकांत सोनवणे उत्तम होटकर धनराज होटकर,हर्षद सोनवणे उपस्थित होते. म्हसवड पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे यांना हे निवेदन सादर केलेला आहे .
अशी माहिती रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दिलेली आहे.यापुढे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे….

               जगदाळे आकाश सातारा

या बातम्या वाचा

Leave a Comment