25 C
मालेगाव
August 4, 2020
Home » लॉकडाउन मध्ये विनाकारण दुचाकीवर फिरण्याचा बेत असेल तर दुचाकी होणार जप्त..!
Uncategorized

लॉकडाउन मध्ये विनाकारण दुचाकीवर फिरण्याचा बेत असेल तर दुचाकी होणार जप्त..!

अॅक्टिव्ह न्यूज/औरंगाबाद
सोपान वाढे
९८८१५४५७६३
दि.०७ जुलै २०२०

नागरिकांनी नियमाचे उल्लंघन केल्यास कठोर कार्यवाही मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय.

औरंगाबाद वाहन वापरास बंदी दुचाकी वापरताना आढळताच दुचाकी जप्त व गुन्हा दाखल करून लायसन्स बाद,रद्द करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी ठणकावले आहे.औरंगाबाद च्या नागरिकांना बाहेर पडण्यास सुद्धा बंदी आहे.
बंद म्हणजे बंद कडक लॉकडाऊन किराणा दुकान,भाजीपाला,बॅंक, कोणतीच आस्थापना ही सुरू करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता लोक प्रतिनिधी व प्रशासन अधिकारी यांनी मिळून येत्या १० ते १८ जुलै दरम्यान कडक संचार बंदी करण्याचे ठरविल्यानंतर आज दि ०७ जुलै रोजी मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी सकाळी पत्रकार परिषदेत संचार बंदी संदर्भात नियोजना संदर्भात बोलताना संगीतले कि. या काळात दुचाकी वापरतांना एखादी व्यक्ती आढळताच दुचाकी जप्त करून गुन्हा दाखल होणार व लायसन्स बाद करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी ठणकावले आहे.
व मनपाच विशेष पथक रस्त्यावर तसेच औरंगाबाद महानगरपालिकेचे ४०० लोकांचे विशेष पथक पोलिसांच्या मदतीस असनार आहे.
म्हणूनच

ॲक्टिव्ह न्यूज सुद्धा आपणास आव्हान करत आहे.
घरी रहा सुरक्षित रहा..!
परिवाराची काळजी घ्या..!
या भयंकर कोरोना विषाणू ची साखळी तोडण्यासाठी
पोलीस व प्रशासनास मदत करा.

या बातम्या वाचा

Leave a Comment