26.3 C
मालेगाव
August 4, 2020
Home » स्वाभिमानीच्या जिल्हाअध्यक्ष यांच्यासह मेहकर विदर्भ कोकण ग्रामिण शाखा व्यवस्थापकांना घेराव.
Uncategorized

स्वाभिमानीच्या जिल्हाअध्यक्ष यांच्यासह मेहकर विदर्भ कोकण ग्रामिण शाखा व्यवस्थापकांना घेराव.

आक्रमक पविञा घेत सोडविल्या पिककर्जाच्या अडचणी.

Activenews – Mehakar.
गजानन तुपकर
तालुका प्रतिनिधी-मेहकर

मेहकर
सध्या शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे एवढे मोठे संकट शेतकर्यांच्या समोर आ करुन उभे आहे. त्यातच बॕंकांकडुन पिककर्जाच्या संदर्भात येणाऱ्या अडचणी बघता त्या सोडविण्यासाठी व तातडीने पिककर्ज मिळवून देण्यासाठी ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष डाॕ.ज्ञानेश्वर टाले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्ते घेऊन आज विदर्भ कोकण ग्रामिण व बॕंक आॕफ महाराष्ट्र बॕंकेमध्ये धडक देली. पिककर्जाबाबत ‘ऑन द स्पॉट फैसला’ ही मोहीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत प्रत्येक तालुक्यातील बँकांमध्ये स्वतः पोहचून ‘ऑन द स्पॉट’ तक्रारी व प्रकरणे मार्गी लावण्याचे काम चालु आहेत. आज ८.जुलै रोजी मेहकर येथिल , विदर्भ क्षेञीय कोकण ग्रामिण बॕंक, बॕंक आॕफ महाराष्ट्र या बँकांमध्ये धडक देत शेतकर्यांच्या पिककर्जाच्या अडचणी सोडवील्या. दिड महीण्याअगोदर ज्यानी फाईल दिल्या त्यांचे पिककर्ज अजुनपर्यंत का दिले नाही आक्रमक पविञा घेऊन जाब विचारला.यावेळी सदर शेतकरी विधवा महीला यांच्यासोबत जाऊन जाब विचारला कि सदर महीलेला आपण पिककर्ज देण्यासाठी विलंब का करत आहे.सदर फाईल आताच मार्गी लावा नाहीतर तोपर्यंत येथुन उठणार नाही अशी भुमिका घेताच.बॕंक प्रशासन नरमले व सदर प्रश्नी मार्गी लागला. पिककर्ज देऊन बँका शेतकऱ्यांवर उपकार करत नाहीत त्यामुळे बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांप्रति सहकार्याची भावना ठेवावी असे आवाहन देखील सुध्दा डाॕ.ज्ञानेश्वर टाले यांनी केले तसेच शेतकऱ्यांना विनाकारण त्रास द्याल तर आम्ही सर्व बॕंकेतच येवून ठाण मांडु असा इशाराही त्यांनी दिला. शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी बिनधास्तपणे ‘स्वाभिमानी’ पदाधिकारी कार्यकर्त्ते यांच्या कडे मांडाव्यात असे आवाहन देखील डाॕ.टाले यांनी केले. यावेळी बॕंक प्रशासनाची धावपळ झाली.
यावेळी जिल्हाअध्यक्ष डाॕ.ज्ञानेश्वर टाले यांच्यासह जिल्हाउपाध्यक्ष अनिलभाऊ बोरकर प्रफुल्ल देशमुख,नितीन अग्रवाल,अमोल धोटे,गणेश जुनघरे,,पप्पु देशमुख,भुषण मोरे,गणेश मोरे,कांबळे,दशराथ सदार,चरण आखाडे,नजिर भाई,दुतोंडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

या बातम्या वाचा

Leave a Comment