28.4 C
मालेगाव
August 3, 2020
Home » मंगरुळपिर तहसील कार्यालायचा “मनमानी कारभार” अल्पभुधारक बळीराजाला वर्षापासून नाहक त्रास…..
Uncategorized

मंगरुळपिर तहसील कार्यालायचा “मनमानी कारभार” अल्पभुधारक बळीराजाला वर्षापासून नाहक त्रास…..

नवनाथ गुठे/चोरद/दिनांक०७/०७/२०२०…..प्रतिनीधी.


मंगरुळपिर तहसील कार्यालयाच्या गलथानपनाचा नाहक त्रास एका वयोवृद्ध-प्रगतशिल शेतकरी 70 वर्षीय चोरद येथील बाबाराव शामराव गुठे यांना सोसावी लागत असल्याची तक्रार अखिल भारतीय तांडा सुधार समितीने महाराष्ट्रराज्याचे मुख्यमंत्री कार्यालयाला,आणि देशाचे पंतप्रधान कार्यालयाला केली आहे.

सविस्तर व्रुत्त असे की, बाबाराव शामराव गुठे रा.चोरद पोष्ट शेलुबाजार ता.मंगरुळपिर जिल्हा वाशिम येथील रहिवासी असुन अल्पभुधारक शेतकरी आहेत. त्यांचे दि.अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.अकोला शाखा शेलुबाजार येथील बँकेचे पास बुक असुन त्या पासबुकाचा बचत खाते क्रमांक व 081092010002464 IFC COD ADCC 0000081) यांचा प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा निधी तहसील.कार्यालयाच्या “मनमानी कारभामुळे” प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा निधी कंझरा येथील लक्ष्मी विश्वनाथ खोरणे या महिलेच्या दि.अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.अकोला शाखा शेलुबाजार येथील बँकेच्या बचत खाते क्रमांक 081092010012464 IFC COD ADCC 0000081) या क्रमांकावर येणारा निधी 6 हजार रुपये जमा झाला.

असुन ति रक्कम या व्यक्तीने विड्राल स्वरुपात खर्च केली आहे. प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकरी गुठे यांनी पुरविलेल्या कागदपत्रांची योग्य ति नोंद न करता त्यांचे बँक खाते क्रमांक मध्ये तहसील कार्यालयाकडुन चुक करण्यात आली. त्यामुळे शासनाकडून आलेला हा निधी लक्ष्मी विश्वनाथ खोरणे या महिलेच्या खात्यात जमा केला. यामध्ये बाबाराव गुठे यांची कुठेही चुक नाही. यामुळे बाबाराव गुठे यांनी तहसील कार्यालय, जिल्हाधीकारी कार्यालय वाशिम यांच्याकडे वेळोवेळी दाद मागितली आहे. पण सिनीयर सिटीझनचा सन्मान राखणाऱ्या महाराष्ट्राच्या या नोकरशाहीने दाद दिली नाही. पर्यायांनी गुठे यांनी तांडा सुधार समितीकडे न्याय देण्याची विनंती केली. तहसिल कार्यालयाने आपल्यावरील जबाबदारी झटकून 1 वर्षापासून ह्या गरीब,होतकरु व वयोवृद्ध नागरिकाला नाहक त्रास देत असल्याचे तांडा सुधार समितीचे मुख्य संयोजक व महासचिव नामा बंजारा यांनी या घटनेची दखल घेत तहसील कार्यालयाने त्यांच्या नावाने आलेला हा निधी 20 दिवसाचे आत सन्मानाने त्यांचे खात्यात जमा करुन त्यांना तसे न कळविल्यास तहसील कार्यालयाचा घेराव करण्यात येईल व याची सर्व जबाबदारी तहसील कार्यालयाची असेल असा ईशारा दिला आहे.

या बातम्या वाचा

Leave a Comment