28.4 C
मालेगाव
August 3, 2020
Home » राज्यपाल नियुक्त जागांमध्ये रामदास दादा कोलेकर यांना विधानपरिषद सदस्य पदी संधी दयावी.
Uncategorized

राज्यपाल नियुक्त जागांमध्ये रामदास दादा कोलेकर यांना विधानपरिषद सदस्य पदी संधी दयावी.

सकल धनगर समाजाची मागणी…!

अॅक्टिव्ह न्यूज/औरंगाबाद प्रतिनिधी – सोपान वाढे
दि.०६ जुलै २०२०

अशी सकल धनगर समाजाची मागणी आहे राज्यपाल नियुक्त बारा रिक्त जागांसाठी शिवसेनेच्या वतीने रामदास दादा कोलेकर यांना विधानपरिषद सदस्य पदी नियुक्ती मिळावी अशी ओबीसी धनगर समाजाची मागणी आहे. महाराष्ट्रात धनगर समाज मोठ्या संख्येने अस्तित्वात आहे .धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी मल्हार महासंघ महाराष्ट्र राज्य च्या माध्यमातून अनेक मोर्चे आंदोलने रामदास दादा कोलेकर यांनी केली आहेत.
धनगर आरक्षण मुद्द्यावर नेतृत्व म्हणून त्यांनी महाराष्ट्रात कार्य केले आहे. गेली २० वर्षापासून तळागाळातील जनतेशी अति उत्तम जनसंपर्क आहे. युवकांचे चांगले संघटन त्यांच्याकडे आहे.रामदास दादा कोलेकर उच्च शिक्षित आहेत. प्रभावी वक्तृत्व असल्याने त्या जनतेला नेहमी संबोधित व जागृती करत असल्याने महाराष्ट्रात चांगल्या परिचयाचे आहेत.
महाराष्ट्र धनगर समाजाचे वेळोवेळी होणारे आंदोलन व त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग व समाज जागृती शिवसेनेसाठी केलेले योगदान खूप महत्त्वाचे आहे
असा समाजातील एक ही उमेदवार आजवर आपण दिला नाही विधांपरिषेदेवर त्यामुळे रामदास दादा कोलेकर यांना संधी द्यावी आणीआपण समाजावर अन्याय केला त्यामुळे धनगर समाजातून रोष आहे त्यामुळे आपण महाविकास आघाडी ने दयव्यात ही नम्र विनंती
यांना शिवसेनेच्या वतीने रिक्त होणाऱ्या बारा जागांपैकी विधानपरिषद सदस्य पदी नियुक्ती मिळावी ,ही सर्व समाज वतीने मागणी करत आहोत. समस्त समाजाच्या या विनंतीला मान्यता द्यावी व विचार व्हावा, हीच अपेक्षा .

या बातम्या वाचा

Leave a Comment