28.4 C
मालेगाव
August 3, 2020
Home » पंढरपुरच्या आषाढी वारीचा खर्च दिला मुख्यमंत्री सहाय्यता निधीली दिला…
Uncategorized

पंढरपुरच्या आषाढी वारीचा खर्च दिला मुख्यमंत्री सहाय्यता निधीली दिला…

वर्षोवर्षी चालु असलेली विठुरायाच्या वारीची परंपरा विस वर्षे सतत करणारे भिमराव नारायण बाजड यांनी वारीच्या खर्चाचा या वर्षीचा अगळावेगळा उपक्रम…

Active News/Gobhani

नरेंद्र वि.अंभोरे
मो.7875946366
दि. 02/07/2020
मांगुळ झनक येथुन काही अंतरावर ग्राम नावली या गावातील प्रतिष्ठित नागरिक भिमराव नारायण बाजड यांनी आषाढी वारीची परंपरा समाजकार्य राष्टसेवेस अर्पीत करत केलेल्या कार्याचे गावाला भुषण…
आषाढी वारी म्हटले की पंढरीचा विठुरायाच्या दर्शनाला सर्व वारकरी विठ्ठल भक्त आपले सर्व काम सोडुन कोणी दिंडी सोबत पायदळवारी तर कुणी बसने आषाढी एकादशीला नचुकता दर्शनाकरीता घराची परंपरागत असणारी वारीला पंढरपुरला जातात. मात्र यावर्षीच्या कोरोना संसर्गजन्य विषाणुचा प्रादुर्भाव असल्याने शासन-प्रशासनाच्या नियमाचे काटेकोर पालन करणारे विठुरायाचा आवडता वारकरी सांप्रदाय भक्तगण,आषाढी वारकरी मंडळी यांनी आपल्या घरीच वारीची परंपरा पार पाडत कोरोना संसर्गजन्य विषाणु काळातल्या लाॅकडाऊनच्या नियमाचे पालण केले…
नावली येथिल आषाढीचे वारकरी भिमराव बाजड यांनी दरवर्षीला वारीला जाण्याकरीता लागणारा चार हजार रुपये खर्च समाजकार्य राष्टसेवेस मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये जमा केला.व आगळावेगळा समाजसेवाचा उपक्रमचं पार पाडला व गांवकरी/पंचक्रोशीत वारकर्‍यांचे राष्टसेवेसाठीचे खरे रुप दाखवुन दिले.
त्यांनी रिसोड येथिल नायब तहशीलदार मा.नपते साहेब यांच्याकडे चेक व्दारे सुपूर्द केला.यावेळेस त्यांचे सुपुत्र भागवत भिमराव बाजड(शिक्षक) डि.ए.बाजड साहेब,नारायण गारडेसर,राहुल साखरेकर सर,दिनकर बाजड,रुपेश बाजड साहेब हे उपस्थित होते…

Narendra Ambhore Gobhani

या बातम्या वाचा

Leave a Comment