28.4 C
मालेगाव
August 3, 2020
Home » पणज येथे जनता कर्फ्यूला गावकऱ्यांचा व्यापक प्रतिसाद
Uncategorized

पणज येथे जनता कर्फ्यूला गावकऱ्यांचा व्यापक प्रतिसाद

अकोट प्रतिनिधी:नितीन तेलगोटे

अकोट तालुक्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलणे गरजेचे होते.कोरोना रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने यावर प्रतिबंध घालण्यासाठी १ जुलै रोजी अकोट येथे पालकमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय बैठक पार पडली,यामध्ये अकोट शहर व तालुक्यात ३ जुलै ते ९ जुलै पर्यंत सात दिवस स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहनही करण्यात आले होते.
या आवाहनाला प्रतिसाद देत आकोट तालुक्यातील ग्राम पणज व बोचरा येथे आज जनता कर्फ्यूला नागरिकांनी व्यापक प्रतिसाद दिला असून संपूर्ण बाजारपेठ दुकाने पूर्णपणे बंद होती. तसेच पणज येथील सरपंच प्रदिप ठाकुर यांनी यावेळी सहकार्य करण्याचे आवाहन गावकऱ्यांना केले व पणज बोचरा गावकरी याला चांगला प्रतिसाद देतांना दिसत आहेत.
आकोट ग्रामीण पोलिसांनी नागरिकांना स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळण्याबाबत आवाहन केले आहे ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी गावापर्यंत पोहोचत नागरिकांना जनता कर्फ्यू यशस्वी करण्याची विनंती केली होती त्यामुळे या आवाहनाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असून आजपासून पुढील सात दिवस पणज येथील दुकाने बंद ठेवून प्रशासनाला सहकार्य करीत नागरिक जनता कर्फ्युला यशस्वी करणार आहेत आज पणज व बोचरा कडकडीत बंद होते आणी अशा प्रकारे गावकरी पुढील सात दिवस कडकडीत बंद पाळणार आहेत
अकोट तालुका यशस्वी होत असलेला जनता कर्फ्यू हा निश्चितच कोरोणाला हद्दपार करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरेल असे प्रतिपादन यावेळी अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी केले

या बातम्या वाचा

Leave a Comment