28.4 C
मालेगाव
August 3, 2020
Home » अकोट शहरात कोरोनाचा दुसरा बळी,नव्या दोन रुग्णासह ३४ कोरोनाग्रस्त
Uncategorized

अकोट शहरात कोरोनाचा दुसरा बळी,नव्या दोन रुग्णासह ३४ कोरोनाग्रस्त

२७ रुग्ण सक्रिय,२ मयत,५ डिस्चार्ज

अकोट प्र: नितीन तेलगोटे

आज आलेल्या अहवाल नुसार अकोट शहरात दोन जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून एक व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे,
मजेदिया प्लॉट येथील ४५ वर्षीय महिलेचा अहवाल आज पॉझिटिव्ह आल्यामुळे महिलेच्या घरातील एका व्यक्तीस क्वारंटाइन करण्यात आले आहे, तर दुसरा रुग्ण हा अकोट शहरातील केशवराज वेटाळ वय वर्ष ( ७० अंदाजे) येथील असून एका व्यावसायिकाचे ते वडील आहेत
हे रुग्ण गेली चार ते पाच दिवस आजारी होते त्यांच्यावर अकोला येथेच उपचार सुरू आहे, आज त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, या व्यक्तीच्या घरातील ३ जणांना क्वारंटाईन करण्यात आले असून अकोट येथील क्वारंटाईन सेंटर ला पाठविण्यात आले आहे,
मजेदिया प्लॉट आणि केशवराज वेटाळ हा दोन्ही भाग सील करण्यात आला असून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे,या भागाला तहसीलदार राजेश गुरव, मुख्यधिकारी दादाराव डोल्हारकर यांनी भेट देऊन सुरक्षा उपाययोजनेचा आढावा घेतला, हा भाग प्रतिबंधित करून निर्जंतुक केल्याची माहिती आरोग्य निरीक्षक चंदन चंडालिया यांनी विदर्भ मतदार शी बोलतांना दिली,
अकोट शहरात २९ जून रोजी पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाल्या नंतर आज २ जुलै रोजी दुसऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वय वर्ष ७१ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली सदर रुग्ण याकूब पुरा येथील रहिवासी असून सेवानिवृत्त शिक्षक असल्याचे समजते, या रुग्णाचा अहवाल २४ जून रोजी पॉझिटिव्ह आला होता, ७१ वर्षीय रुग्णाचा परिवारातील निकटवर्तीय ९ व्यक्ती क्वारंटाईन करण्यात आले होते त्यांच्यापैकी दोन मुलीचा अहवाल एक नऊ वर्षीय दुसरी सोळा वर्षीय यांचा १ जुलै रोजी पॉझिटिव्ह आला होता
त्यानंतर २ जूलैला या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला, सदर व्यक्तीस आंबोडी वेस येथील दफनभूमीत दफनविधी करण्यात आला,यावेळी प्रशासनातर्फे सर्व उपाययोजना करण्यात आल्या होत्या,
आज अकोट तालुक्यात एकूण ३४ कोरोनाग्रस्त रुग्ण असून त्यापैकी २ रुग्ण मयत,५ उपचार घेऊन घरी सोडण्यात आले असून सध्या सक्रिय रुग्ण संख्या २७ असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे,

या बातम्या वाचा

Leave a Comment