28.4 C
मालेगाव
August 3, 2020
Home » पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर कोविड योद्धा ने सन्मानित
आपला जिल्हा करोना अपडेट्स

पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर कोविड योद्धा ने सन्मानित

मानवाधिकार सुरक्षा संघाचे प्रमुख विवेक ओबेराॅय यांनी घेतली कार्याची दखल

प्रतिनिधि:- तनवीर मजीद बागवान
जालना- जिल्हा

जगभरामध्ये धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना महामारी च्या या संकट काळामध्ये अंबड पोलीस परिक्षेत्र मध्ये कायदा-सुव्यवस्था, संचार बंदी, लॉक डाऊन बाबत कडक भूमिका घेऊन कोरोना महामारी च्या प्रसाराला प्रतिबंध करण्यात मोलाची भूमिका बजावणारे अंबड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांची मोलाची भूमिका बजावली आहे. सर्वसामान्यांच्या मनातही त्यांनी आपल्या कार्याची वेगळी छाप सोडली आहे. या काळामध्ये त्यांनी रात्रंदिवस लॉक डाऊन व संचारबंदीच्या नियमाचे कडक पणाने अमल बजावण्यासाठी जागता पहारा देत आहेत. प्रसंगी संचारबंदी व लॉक डाऊन चे नियम मोडणाऱ्यावर कायद्याचा बडगा उगारला जात होता. अंबड पोलीस स्टेशन क्षेत्रांमध्ये ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे.त्या ठिकाणी कॉन्टॅटमेंट झोन ची कडक अंमलबजावणी करून सर्वसामान्यांना नाहक त्रास होणार नाही याची पुरेपूर दक्षता घेतली. वेळोवळी कोरोना बाबत अफवा वर चुकीचे माहिती बसविण्याबाबत त्यांनी सर्वसामान्यांमध्ये जागृती निर्माण केली. या काळामध्ये सर्वसामान्यांना भाजीपाला, जीवनावश्यक वस्तूची, इतर आजारपणा बाबत हॉस्पिटल सेवा सुरू राहण्याबाबत कसल्याही प्रकारची गैरसोय होऊ दिली नाही. याबाबत कायदेशीर आणि नियमानुसार उत्कृष्ट नियोजन नांदेडकर यांनी केले होते.
त्यांच्या उत्कृष्ट, कार्यतत्पर कामगिरीची दखल मानवाधिकार सुरक्षा संघाचे प्रमुख व सिने अभिनेता विवेक ओबेराय यांनी घेऊन त्यांना कोविड योद्धा म्हणून प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
मानवाधिकार सुरक्षा संघ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अफसर शेख महासचिव पुष्कर सराफ प्रदेश कार्याध्यक्ष कमलेश शेवाळे प्रदेश संपर्कप्रमुख वजीर शेख यांनी मानवाधिकार सुरक्षा संघ जालना जिल्हा जिल्हाध्यक्ष तनवीर बागवान जिल्हा सचिव राधाकिशन आव्हाड जिल्हा मार्गदर्शक भगवान धनगे जगन्नाथ जाधव कार्याध्यक्ष महेश सरणीकर जिल्हा संपर्क प्रमुख अनिल भालेकर कमरान काजी बाबासाहेब खरात सिराज काजी तालुका अध्यक्ष तारेक सय्यद यांच्या हस्ते अनिरुद्ध जी नांदेडकर यांचा गौरव करण्यात आला.

या बातम्या वाचा

1 comment

Shankar Rohidas Barse July 18, 2020 at 3:18 am

Ranjanaon sp

Reply

Leave a Comment