25.4 C
मालेगाव
July 8, 2020
Home » शिरपूर जैन येथे गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धभिषेक
Uncategorized

शिरपूर जैन येथे गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धभिषेक

आज दिनांक 29 जून रोजी शिरपूर येथील होळकर चौक येथे मा. बाळूभाऊ मुरकुटे नगर सेवक वाशिम यांच्या नेतृत्वात मा.आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेची दुधाने अंघोळ घालून शुद्धीकरण करण्यात आले काही दिवसांपुरी शरद पवार यांच्या विषयी काही शब्द वापरल्याने पडलकरांच्या प्रतिमेची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या विटंबना केली होती.

त्यांचे शुद्धीकरण म्हणून आज दिनांक 29 जून रोजी स्थानिक होळकर चौक येथे त्यांना दुधाने अभिषेक करून शुद्ध केले व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जाहीर निषेध केला.

यावेळी युवा मल्हार सेनेचे पवन गावंडे म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बहुजन समाज सोबत आतापर्यंत अन्याय करत आला आहे. आणि आता कुठे बहुजन समाजाला आमदारकी मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे त्यांच्या वर खोटे आरोप लावत आहे तसेच त्यांनी शरद पवार यांना शरद पवार हे महाराष्ट्रातील कोरोना आहे एवढे म्हणताच त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी मा.गोपीचंद पडळकर साहेब यांच्या प्रतिमेचे विटंबना करत आहे आणि धमक्या देत आहे त्यांना आमच्या बहुजन समाजाचे आवाहन आहे की त्यांनी पडळकर साहेबाच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्रातील बहुजन समाज हा शांत बसणार नाही.

यावेळी उपस्थित पवन गावंडे, यादव खोरने, प्रल्हाद बोबडे,ओंकार गावंडे,ओंकार खोरने, बालू गावंडे, ऋषिकेश खोरने, लक्ष्मण कुटे, उमेश बोबडे, उमेश गावंडे, वैभव बोबडे, मारोती गोरे, राजू बोबडे व आदी धनगर समाज बांधव उपस्थित होते….

या बातम्या वाचा

Leave a Comment