25.4 C
मालेगाव
July 8, 2020
Home » डॉ. विजया देशमुख यांचेकडून आर्सेनिकम अल्बम गोळ्यांचे विनामुल्य वाटप
आपला जिल्हा करोना अपडेट्स महाराष्ट्र मालेगांव वाशिम विदर्भ

डॉ. विजया देशमुख यांचेकडून आर्सेनिकम अल्बम गोळ्यांचे विनामुल्य वाटप

आज पर्यंत ३ हजार चे वर नागरिकांना गोळ्यांचे वाटप

शिरपूर  /प्रतिनिधी किशोर देशमुख

डॉ. विजया देशमुख

महाराष्ट्रा मध्ये कोरोना महामारीने प्रचंड धुमाकूळ घातला असून सर्व सामान्य नागरिक या महामारीने हतबल झालेले आहेत. प्रशासनाच्या वतीने योग्य ती दक्षता, खबरदारी व सुरक्षेचे उपाय करण्यात येत आहेत. कोरोनावर उपचार म्हणून कोणतेही लस निघालेली नसून कोरोना आजारा विरुद्ध रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुष मंत्रालय भारत सरकार द्वारा आर्सेनिक अल्बम_ ३० ह्या होमिओपॅथी औषधास मान्यता दिली आहे. शिरपूर येथील प्रसिद्ध डॉक्टर विजया श.देशमुख यांच्या कडून सदर औषध विनामुल्य ३ हजार नागरिकांना वाटप करण्यात आले आहे.

कोरोना महामारी पासून बचाव करण्यासाठी जगामध्ये सध्या कोणतीही लस उपलब्ध नाही त्यामुळे शरीरातील प्रतिकार शक्ती वाढवणे हाच एकमेव उपाय तज्ञांकडून सांगण्यात येत आहे.  सदर औषधास आयुष मंत्रालय भारत सरकार द्वारा मान्यता मिळाली आहे. कोरोना महामारी विरुद्ध सर्वच आघाड्यांवर लढाई सुरु आहे. या साठी बरेच नागरिक आप आपल्या परीने मदत करीत आहेत.

शिरपूर येथील डॉ. विजया देशमुख नेहमीच सेवाभावी,सामाजिक कार्यास अग्रेसर असतात, रुग्णांच्या सेवेत २४ तास तत्पर असतात तर त्यांच्या कडे येणाऱ्या महिला रुग्णाला सेवा देण्याचे त्या नाकारत नाहीत. गेल्या अनेक वर्षापासून डॉ. देशमुख यांनी सदर औषध सेवा भावी दृष्टीकोनातून विनामुल्य वाटप करण्याचा निश्चय केला असून त्यांनी आज पर्यंत शिरपूर व परिसरातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून खेडगावात व शिरपूर शहरात मोफत औषधी पोहोचवण्याची व्यवस्था केली आहे. तर दिनांक १ जुलै आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर शिरपूर जैन येथील जय गजानन सेवाधारी महिला मंडळ डॉ. विजया देशमुख यांच्या या सेवाभावी उपक्रमास शिरपूर येथील सर्व नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचे कार्य संत गजानन भक्त रवी पुरी यांच्या नेतृत्वात पोहोचवण्याचे कार्य करणार आहेत. सदर सेवाभावी कार्याने शिरपूर शहरामध्ये त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.     

या बातम्या वाचा

Leave a Comment