28.8 C
मालेगाव
July 8, 2020
Home » अकोट मध्ये कोरोनाचा कहर ; चोवीस तासात १२ रुग्णांची वाढ
अकोला आपला जिल्हा महाराष्ट्र विदर्भ

अकोट मध्ये कोरोनाचा कहर ; चोवीस तासात १२ रुग्णांची वाढ

अकोट प्रतिनिधी’: नितीन तेलगोटे

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अकोट तालुक्यात दिवसेंदिवस वाढतच असून आज आलेल्या अहवाला नुसार अकोट शहरात चोवीस तासात १२ नव्या रुग्णाची नोंद झाली आहे,
अकोट मध्ये २७ जून पर्यंत एकूण रुग्ण संख्या १४ असून त्यापैकी ११ रुग्ण सक्रिय तर ३ जण उपचार घेऊन बरे झाले होते, आज २८ जून रोजी आलेल्या अहवाल नुसार शहरात नव्या १२ रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्ण संख्या २६ झाली आहे, त्यापैकी अकोट तालुक्यात २३ रुग्ण सध्या सक्रिय आहेत, आज च्या अहवालात १२ पैकी ११ लोकांची माहिती मिळाली असून १ पॉझिटिव्ह व्यक्ती बद्दल अद्यापही माहिती मिळू शकली नाही, आज च्या अहवालात टेकडी पुरा येथे ५ क्वारटाईन रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, त्याच बरोबर राजदे प्लॉट येथील २ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असून त्याच्या घरचे ९ जण क्वारणटाईन करण्यात आले, जवाहर रोड जयस्तंभ चौक येथील २ रुग्ण अमरावती येथील बेस्ट हॉस्पिटलमध्ये उपचार घेणे सुरू आहे, सिंधी कॅम्प येथे १ रुग्ण पॉझिटिव्ह, त्याच्या घरातील सर्व लोकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत , इफतेखार प्लॉट येथे १ रुग्ण पॉझिटिव्ह आला असून घरातील ६ लोकांना क्वारणटाईन करण्यात आले आहे, स्थानिक प्रशासनातर्फे टेकडी पुरा, राजदे प्लॉट, इफतेखार प्लॉट, जवाहर रोड जयस्तंभ चौक येथील गल्ली सील करण्यात आली असून सदर परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे,
कोरोना रुग्ण आढळलेला परिसर २७ जून च्या रात्रीच सील केला असून घटनास्थळी तहसीलदार राजेश गुरव, ठाणेदार संतोष महल्ले, मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर, आरोग्य निरीक्षक चंदन चंडालिया यांनी भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेतला.

——————– ————- ———-
पोपटखेड मध्ये सहा बाधित ?
प्रशासनाची तारांबळ

वेगवेगळ्या पोर्टल वरील व्हाट्सएपच्या ग्रुप वर अकोट तालुक्यातील पोपटखेड येथे कोरोनाचे सहा नवे रुग्ण पॉझिटिव्ह असल्याची चुकीची माहिती रविवार २८ जून रोजी सकाळी आलेल्या अहवालात मिळाली. अधिकृत सूत्रांकडून आलेली माहिती सर्व व्हाट्सएपच्या वेगवेगळ्या ग्रुप वर येताच पोपटखेड येथील नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले, नंतर काही वेळाने हे रुग्ण पोपटखेड रोड आयटीआय येथील क्वारटाईन सेंटर येथे पॉझिटिव्ह झाल्याची माहिती आली, त्यामुळे पोपटखेड ता. अकोट या नावाने आलेल्या माहितीमुळे सर्वत्र गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती, यामध्ये प्रशासनाचा बराचसा वेळ ही खर्चिक गेला,

या बातम्या वाचा

Leave a Comment