25.4 C
मालेगाव
July 8, 2020
Home » कोरोनाचा कहर; जानगीर महाराज संस्थानने घेतला शेवटी हा निर्णय…
आपला जिल्हा करोना अपडेट्स महाराष्ट्र मालेगांव वाशिम विदर्भ

कोरोनाचा कहर; जानगीर महाराज संस्थानने घेतला शेवटी हा निर्णय…

संस्थानचे धार्मिक कार्यक्रम रद्द

जनारोग्यासाठी संस्थानचा पुढाकार

स्थानिक जानगीर महाराज संस्थान गत १९ मार्च पासून कुलूपबंद आहे. जुलै महिण्यात येणारा संस्थानचा आषाढी एकादशीचा भागवत सप्ताह आणि प.पू. ओंकारगीर बाबा पुण्यतिथी सोहळा देखील यावर्षी रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे भक्तांनी संस्थानवर न येता स्वगृहीच पारायण करावे, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे संस्थानच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक जानगीर महाराज संस्थानने शासनाचा आदेश येण्यापूर्वीच मंदीर बंद करुन सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द केले होते. दि.१९ मार्च पासून बंद असणारे मंदीर शासनाच्या पुढील आदेशापर्यंत बंदच असणार आहे. शिवाय सालाबादप्रमाणे जुलै महिण्यात येणारा आषाढी एकादशीचा भागवत सप्ताह आणि प.पू.ओंकारगीर बाबांचा पुण्यतिथी सोहळा देखील रद्द करण्याचा निर्णय संस्थानने घेतला आहे. प.पू.ओंकारगीर बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी पारायण करणाऱ्या भक्तांनी यावर्षी स्वगृहीच पारायण करावे, असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
वाशिम जिल्ह्यात कोरोनाची घोडदौड सुरु झालेली आहे. परंतू अजूनही शिरपूर शहर कोरोनामुक्तच आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये दि.१ जुलै बुधवार रोजी आषाढी एकादशीला आणि दि.१३ जुलै सोमवार रोजी प.पू.ओंकारगीर बाबांच्या पुण्यतिथीला भक्तांनी संस्थानवर गर्दी करु नये, असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आलेले आहे. कोरोनामुक्तीच्या लढ्यात समस्त भक्तगणांनी प्रशासनाला सहकार्य करावे, अशी देखील संस्थानने अपेक्षा व्यक्त केली आहे.

या बातम्या वाचा

Leave a Comment