28.8 C
मालेगाव
July 8, 2020
Home » राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या त्या वक्तव्याचा निषेध
आपला जिल्हा महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या त्या वक्तव्याचा निषेध

रिसोड तालुक्यात जोरदार घोषणाबाजी सह पडळकरांचा निषेध

Active news/ केनवड

प्रभाकर नाईकवाडे
मो.7218114784
सहप्रतीनिधी
फिरोज शाह
मो.9623132977

राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

केनवड
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या व्यक्ततव्या वर रिसोड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस चे कार्यकर्ते आक्रमक होऊन जोरदार घोषणांबाजीसह पडळकरांचा निषेध नोंदवला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बाबाराव पाटील खडसे यांच्या आदेशान्वये व रिसोड तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे तेजराव पाटील वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 28 जून ला सकाळी 11 वाजता कुकसा फाटा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे रिसोड तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्यावर गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याने त्यांचा प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून व टायर जाळून निषेध करण्यात आला.
व या विरोधात पडळकर मुर्दाबाद अश्या जोरदार घोषणाबाजीही यावेळी करण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यांनी सांगितले की गोपीचंद पडळकर यांनी औकादीत राहून तोंड उघडावे अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस तुम्हाला दार उघडू देणार नाही. यावेळी राष्ट्रवादी ता.अध्यक्ष तेजराव पाटील वानखेडे, मुरलीधर जुनघरे, पंकज वानखेडे, नारायण पाटील, पुंजाजी चिखलकर, अनंत देशमुख , किसनराव ठोकरे,नामदेव जाधव, दत्तराव वानखेडे, बबनराव जुनघरे गजानन शिंदे, रामदास भिलंग, क्रिष्णा वानखेडे, अक्षय वानखेडे, गजानन शिंदे, रुपराव वाळुकर दत्ता पाटील, व पदाधीकारी व कार्यक्रत्ये उपस्थित होते.

या बातम्या वाचा

Leave a Comment