26.3 C
मालेगाव
August 4, 2020
Home » महाराष्ट्रातील सर्वात मोठा दहीहंडी सोहळा गेल्या 350 वर्षांच्या इतिहासात प्रथमच होणार साधेपणाने
आपला जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र मेहकर विदर्भ

महाराष्ट्रातील सर्वात मोठा दहीहंडी सोहळा गेल्या 350 वर्षांच्या इतिहासात प्रथमच होणार साधेपणाने

Activenews – Mehakar.
गजानन तुपकर
तालुका प्रतिनिधी-मेहकर

मेहकर
संतांचे माहेर घर म्हणून समजल्या जाणाऱ्या प्रति पंढरपूर देऊळगाव माळी येथे दरवर्षी महाराष्ट्रातील सर्वात मोठा दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. प्रति पंढरपूर देऊळगाव माळी मध्ये आषाढी महोत्सव मोठ्या थाटामाटात पार पडत असतो. धार्मिक-सांस्कृतिक, भागवत कथा, किर्तन, जनजागृतीपर कार्यक्रम, येथे होत असतात. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गोपाळकाला होतो, लगेच दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील सर्वात मोठी दोनशे किलोची दहीहंडीचा कार्यक्रम पार पाडण्यात येतो. दहीहंडीच्या दिवशी साक्षात पंढरीचा पांडुरंग देउळगावी येतो अशी अख्यायिका आहे. काळा पाषाण मूर्ती मधून दहीहंडी च्या वेळेस प्रत्यक्ष विठू माऊलीच्या मूर्ती मधून घाम वाहत असतो. दहीहंडी च्या दुसऱ्या दिवशी पुरातन लाकडी विठ्ठल-रुक्मिणीच्या मुर्त्या पालखीत सजवून गावातून मिरवणूक काढली जाते, या महोत्सवासाठी पंचक्रोशीतील भाविक भक्त, वारकरी मंडळी, तसेच तीनशेहून अधिक दिंड्या सहभागी होत असतात. तसेच या महोत्सवादरम्यान कुस्त्यांची फार मोठी दंगल ही ठेवण्यात येते. परंतु कोरोणाच्या पाश्र्वभूमीवर यावर्षी या सर्व कार्यक्रम रद्द ठेवून परंपरा खंडित होऊ नये म्हणून शासनाच्या नियमाप्रमाणे विधीवत पूजन करण्यात येणार आहे.

या बातम्या वाचा

Leave a Comment