28.4 C
मालेगाव
August 3, 2020
Home » मोप ता.रिसोड येथे काल ढग फुटी झाल्याने नदीनाले एक झाल्याने गांवकर्‍याची तारांबळ…
आपला जिल्हा कृषीवार्ता वाशिम

मोप ता.रिसोड येथे काल ढग फुटी झाल्याने नदीनाले एक झाल्याने गांवकर्‍याची तारांबळ…

या वर्षी काही भागांत ढगफुटी मुसळधार पाऊस तर काही गांवे समाधानकारक पावसाच्या प्रतिक्षेत

नरेंद्र वि.अंभोरे
मो.7875946366
दि.25/06/2020

रिसोड येथुन काही अंतरावर मोप येथे व आजुबाजुच्या असोला,चाकोली,कन्हेरी आदी काही गावात दि.25 जुनला सायं 5:10 च्या सुमारास अतिवृष्टी होऊन मोप या गावांवर व शेतशिवारात ईतर काही गावावर ढगफुटी होऊन मुसळधार पाऊस होऊन आसमाणी संकटचं जणु कोसळले.
ढग फुटी झाल्याने अतीवर्षावामुळे गावांजवळुन जाणारी नदी-नाल्याला व काही जमीनीवर तलाव सारखेचं दुष्य दिसु लागले .व शेतातील पाटबंधारे एक झाल्याले काही प्रमाणात शेतीचे नुसकान शेतशिवारात पाहवयास मिळाले. सद्यास्थितीला धरणीत रुजवलेले शेतकर्‍यांचे पेरले सोयाबीन,तुर आदी पिक कोवळ्या वयात आहेत त्यामुळे व काही ठिकाणी पेरणी केलेल्या जमिनीवर तलाव सारखे दुष्य …
गावांवर/शेतशिवारात झालेली सोयाबीन,तुर,ऊडीद मुंग काही ठिकाणी खरडले. व काही ठिकाणी माती गाळ साचला अतीवृष्ठीमुळे गावातील वृध्द जाणकाराच्या सांगण्यावरुन
गेल्या काही वर्षात अशी अतीवर्षा झाली नसल्याचे सांगण्यात येते.मोप येथिल शेतकरी पंढरी नरवाडे वयाच्या पंच्यावन्नीतील असणारे यांच्या सांगण्यावरुन त्यांच्या आयुष्यातील असा पाऊस झाल्यांची पहीलीचं वेळ आहे असे त्यांनी सांगितले.
यावर्षी रिसोड तालुक्यातील काही भागात ढग फुटी अतिवृष्टी पाहावयास मिळते…तर काही गावात शेतकरी सामाधानकारक पाऊसाच्या प्रतिक्षेत असुन दुब्बार पेरणी करुनही अजुन ढगाळलेल्या नभा कडे टक लाऊनचं बघत आहेत.
असा ढग फुटी/अतिवृष्टीच्या निसर्गाच्या प्रकोपामुळे पहीलेच कोरोनावर शेतकर्‍यांनी आपल्या परीस्थिस्तीवर जेमतेम कशीबशी मात करत पेरणी केली असता यावर्षी परत परत पेरणी वेळ येऊन राहीली. याला निसर्गाचा प्रकोप म्हणावे का? मानवतेने निसर्गाशी केलेले काही कृत्य (वृक्षतोड) यामुळे त्यांचे भोग त्यांला भोगावे लागा लागले की काय.
हे एक अगदी कट्टु सत्य आहे.पुढेही बळीराजा सामोरे असेचं जावे लागणार का?
हा प्रश्न सर्वा समोर उभा थाटला आहे…

या बातम्या वाचा

1 comment

mm
Chief Editor - 9970956934 June 26, 2020 at 9:51 am

Great

Reply

Leave a Comment