25 C
मालेगाव
August 4, 2020
Home » महिलांवरील अन्याय,अत्याचार थांबवायचे आहेत ना !
आपला जिल्हा उमरखेड महाराष्ट्र यवतमाळ

महिलांवरील अन्याय,अत्याचार थांबवायचे आहेत ना !

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य ही संघटना येईल मदतीला धावून

अॅक्टीव न्युज ऊमरखेड.
गजानन वानखेडे.
तालुका प्रतिनिधी ऊमरखेड.
दिं.१९.०६.२०२०.
……………………………
अपंग, विधवा, परीत्यकत्या, घटस्फोटीत महीलांना सहानुभूतीने जवळ आणून त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी फक्त महीलाच पुढाकार घेऊन त्यांना सहकार्य करण्याचे सामर्थ्य महीलांमध्येच असते ही बाब ओळखून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या विदर्भ प्रदेश महिला अध्यक्षा दैनिक सिंहझेपच्या पत्रकार सविता चंद्रे यांनी पुढाकार घेऊन महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी पाऊल उचलले आहे. बचत गटातील महिला आज स्वत:च्या पायावर उभ्या आहेत, त्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे म्हणून सविता चंद्रे यांनी महिलांचा सर्वांगिण विकास कामे करण्याचे ठरवले.
आजही महीला सुरक्षित नाहीत, त्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे पण , आजच्या काळात त्यांना मदत करणे सर्वांचे कर्तव्य आहे.
काही स्त्रियांचे पती मद्यपान करून त्यांना मारहाण करतात, हुंड्यासाठी पत्नीला त्रास देतात पण महिला कोणालाही सांगत नाहीत अशा महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी सविता चंद्रे हिरिरीने भाग घेऊन त्यांना आपुलकीने विचारपूस करून सहानुभूतीने जवळ आणून त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी समोर येत आहेत.
बर्याच महिला अपंग आहेत पण, त्यांना शासन कोणतीही मदत करीत नाही. विधवा महिलांना मुलांच्या शिक्षणासाठी जबाबदारी पार पाडावी लागते पण त्यांना कोणाचेही सहकार्य मिळत नाही, त्यामुळे हतबल होऊन निराश होतात.
आजही महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात पण त्यांना योग्य तो सन्मान मिळत नाही त्यासाठी प्रत्येक महिलांनी सविता चंद्रे यांना साथ देऊन आपले स्थान जगासमोर आणून महिला एकीचे बळकटीकरण सिद्ध करावे.प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य ही संघटना विदर्भातील महिला सक्षमीकरण, सामाजिक, शैक्षणिक , कार्य करण्यासाठी सक्रीय आहे, महिलांच्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी महीलांचे एकीचे बळ दाखवण्यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रा. आंबेगावे डी.टी यांनी आवाहन केले आहे.त्यांचे मार्गदर्शन लाभेल व संघटनेतील व इतर महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
महिलांचा आदर केला पाहिजे, त्यांचा सन्मान केला पाहिजे यासाठी ही संघटना अग्रेसर आहे. आज शिक्षण घेऊन मुली नौकरी करतात पण घरच्या जुन्या विचारांमुळे महिला गप्प बसतात त्यांना काहीच विचार स्वातंत्र्य दिले जात नाही त्यामुळे त्यांच्यामध्ये न्युनगंड निर्माण होतो, एकलकोंडेपणा येतो.
अशा महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी ७२१९१४९०११ या मो न वर संपर्क करावे असे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या विदर्भ प्रदेश महिला अध्यक्षा सविता चंद्रे यांनी आवाहन केले आहे.त्या पुढाकार घेऊन महिलांचे समुपदेशन, सक्षमीकरण करण्यासाठी पुढाकार घेत आहेत आपल्या सर्वांचे सहकार्य मिळेल ही अपेक्षा !

गजानन वानखेडे.

तालुका प्रतिनिधी ऊमरखेड.

या बातम्या वाचा

Leave a Comment