25 C
मालेगाव
August 4, 2020
Home » नाव्ही समाज हतबल आर्थिक मदतीची शासनाकडे मागणी
Uncategorized आपला जिल्हा महाराष्ट्र मालेगांव वाशिम विदर्भ

नाव्ही समाज हतबल आर्थिक मदतीची शासनाकडे मागणी

Active news प्रतिनिधी: बाळा साखरे

आज दिनांक १८/६/२०२०
जागतिक कोरोनाचा महामारी मध्ये भारत देश सुद्धा आहे त्यामुळे संपूर्ण देशा सहित महाराष्ट्र मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने लॉकडाऊन घोषित केले आहे त्यामुळे सर्वच व्यवसाय 3 महिन्यापासून बंद आहेत,परंतु काही भागात लॉकडाऊन शिथिल करण्यात आले आहेत व व्यावसाय शासनाच्या नियमाने सुरू आहेत परंतु नाव्ही समाजावर उपासमारीची वेळ आली आहे, २२ मार्च पासून सलग तीन महिने सलून दुकान बँद आहेत,त्यामुळे दुकान भाडे,घर खर्च, कसा होणार या चिंतेने नाव्ही समाज हतबल झाला आहे , नाव्ही समाजातील सलून चालकांची मागणी आहे की 10 हजार रुपये महिना नुसार मदत मिळाली तर सलून दुकानाचे भाडे व उपासमार होणार नाही अशी अपेक्षा सरकारकडे करत आहेत यावर सरकारने सुद्धा विचार करायला हवा असे नाव्ही समाजाच्या वतीने बोलले जात आहे आर्थिक मदत द्यावी व मुद्रा लोन उपलब्ध करून द्यावे असे ऍक्टिव्ह न्यूज शी नाव्ही समाजाचे शिरपूर जैन येथील
नागरिकानी बोलताना सांगितले सलून चालक उद्धव शिंदे संतोष पवार मुरली मारवाडी जगन पवार अनिल साखरे गजानन मारवाडी गोपाल मारवाडी हे सर्व सलून चालक शासनाला विनंती करत आहेत की आम्हाला नियम लागू करून दिले तर आम्ही त्या नियमांचे पालन करून सलूनदुकान सुरू करू अशी मागणी शिरपूर जैन तालुका मालेगाव जिल्हा वाशिम या नाव्ही समाजाची मागणी आहे

या बातम्या वाचा

Leave a Comment