26.3 C
मालेगाव
August 4, 2020
Home » कोविड योध्यानी स्वतःसह कुटुंबाच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी – जिल्हाधिकारी डॉ. शिंदे ; Kovid Yodhani should take care of the health of himself and his family – Collector Dr. Shinde
Uncategorized

कोविड योध्यानी स्वतःसह कुटुंबाच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी – जिल्हाधिकारी डॉ. शिंदे ; Kovid Yodhani should take care of the health of himself and his family – Collector Dr. Shinde

पोशेरी येथे पोलिसांसाठी विशेष कोविड सेंटर ; Special Kovid Center for Police at Posheri

वाडा:वार्ताहर/ संजय लांडगे
 कोविडशी लढणाऱ्या योद्ध्यांनी  वैयक्तिक स्वच्छतेसह आपल्या कुटुंबाचीही विशेष काळजी घ्यावी, असे प्रतिपादन पालघर जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.
  वाडा तालुक्यातील पोशेरी येथील आयडियल कॉलेजमध्ये पालघर जिल्ह्यातील पोलिसांसाठी विशेष कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. हे सेंटर शुक्रवारी (५ जून) पालघर जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू करण्यात आले. प्रशासनातील आरोग्य, महसूलविभागांसह पोलीस बांधव यांचा जनतेशी जास्त संपर्क येत असल्याने त्यांनी स्वतः व त्यांच्या कुटुंबाची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असून सुरक्षेची साधने व त्यांची काळजी घेण्यासाठी असलेली चांगली आरोग्य व्यवस्था यामुळे कोविड योध्यांचे मनोधैर्य वाढण्यास मदत होईल, असा विश्वासही डॉ. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. तर हे पोलिसांसाठी असणारे विशेष कोविड आरोग्य सेंटर मुंबई वगळता राज्याच्या ग्रामीण भागातील  पहिलेच असून यामुळे पोलिसांना याचा विशेष फायदा होईल, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी यावेळी केले.
           यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कांचन वानेरे, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, वाडा तहसीलदार डॉ. उध्दव कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेशी, वाडा पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी, गटविकास  अधिकारी राजलक्ष्मी येरपुडे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय बुरपल्ले यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
        वाडा तालुक्यातील पोशेरी येथील आयडियल कॉलेजमध्ये अगोदरपासून कोविड सेंटर सुरू असून या ठिकाणी एकूण ३०० बेडची व्यवस्था आहे. यापैकी जिल्ह्यातील पोलिसांसाठी १०० बेडची विशेष व्यवस्था करण्यात आली असून या ठिकाणी कोरोना रुग्णांच्या संपर्कातील पोलिसांना अलीगकरण करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

या बातम्या वाचा

Leave a Comment