Uncategorized
साकळी येथील शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

मनवेल ता.यावल : प्रतिनिधी
दिनांक 26 जानेवारी 2023 गुरुवारी शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय साकळी येथे 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब श्री वसंतराव रामजी महाजन, उपाध्यक्ष नानासाहेब श्री सुभाषराव भास्करराव महाजन, श्री प्रमोद भाऊ रमेश सोनवणे, ताईसाहेब विद्याताई वसंतराव महाजन, संचालक श्री रामभाऊ दगडू निळे,सन्माननीय संचालक मंडळ, ग्रामपंचायत सदस्य, माजी सैनिक, प्राचार्य श्री आर जे महाजन, पर्यवेक्षक श्री एस जे पवार, सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर बंधू भगिनी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. गावातून ढोल ताशाच्या गजरात देशभक्तीच्या घोषवाक्यात प्रभात फेरी काढण्यात आली यानंतर माननीय संचालक श्री रामभाऊ दगडू निळे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर कार्यक्रमात नाटिका, नृत्य,देशभक्तीपर गीत, बक्षीस वितरण करण्यात आले यानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री वाय बी सपकाळे यांनी केले
सदर कार्यक्रमाचे यशस्वी साठी प्राचार्य पर्यवेक्षक शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.