Uncategorized

थोरगव्हाण येथील जि.प.शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा. शालेय क्रिडा स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्याना केले बक्षिस वाटप!.. खेळ खेळल्याने खिलाडूवृत्ती निर्माण होते – मुख्या. महेंद्र देवरे.


गोकुळ कोळी
मनवेल ता.यावल – यावल तालुक्यातील जि प शाळा थोरगव्हाण येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहन शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र देवरे यांनी केले. शाळा व्यवस्थान समितिचे अध्यक्ष विनोद भालेराव व प्रमुख पाहुणे गावाचे पोलीस पाटील गजानन चौधरी व सर्व पालक वर्ग शिक्षक वृंद उपस्थित होते.
जानेवारी महिन्यात शालेय क्रिडास्पर्धा झाल्या व सर्व विजयी विद्यार्थ्याना बक्षीस वाटप करण्यात आले. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, व सर्व सदस्य तसेच ग्रामपंचायतील संरपच, उपसरपंच व सदस्य, अंगणवाडी सेविका व शिक्षक यांच्या हस्ते विद्यार्थ्याना बक्षीस वाटप करण्यात आले.
शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र देवरे यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगून स्वातंत्र्य – समता – बंधुता – न्याय या मूल्यांवर आधारित आपले संविधान आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार आहेत. आपले संविधान आपला आत्मसन्मान आहे. तसेच खेळ खेळल्याने शरीर तंदुरुस्त राहते व विद्यार्थ्यांमध्ये खिलाडूवृत्ती निर्माण होते विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो असे प्रतिपादन देवरे यांनी केले.
याप्रसंगी शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनोद भालेराव, उपाध्यक्ष संदिप सोनवने सदस्य विनोद पाटील, समाधान सोनवने, पोलीस पाटील गजानन चौधरी व सर्व सदस्य, गावातील सर्व माता व पालक वर्ग , ग्रामपंचायतील सरपंच व सर्व सदस्य ,मुख्याध्यापक महेंद्र देवरे, एकनाथ सावकारे , निलेश धर्मराज पाटील, उपस्थित होते. शेवटी विद्यार्थ्याना बिस्कीट , चॉकलेट देऊन तोंड गोड करण्यात आले. सर्व शालेय कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार निलेश माधवराव पाटील यांनी मानले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!