Uncategorized

यावल येथे २३ जानेवारी सोमवार पासून हात से हात जोडो अभियानाला सुरुवात

यावल ( प्रतिविधी ) येथील तालुका व शहर कॉग्रेस कमिटीचे “हात से हात जोड़ो” अभियानास सुरुवात होत असुन या अभियानास यशस्वी करण्यासाठी पक्षाच्या सर्व पदाधिकारी यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन कॉंग्रेस कमेटीच्या वतीने करण्यात आले आहे . यावल तालुक्यात आज दिनांक २३ जानेवारी सोमवार पासुन सकाळी १०:३० वाजता यावल शेतकी संघ येथे “हात से हात जोड़ो” अभियान शुरु होण्याचे अगोदर पक्षचे ध्वजारोहण काँग्रेस कमेटीचे प्रदेश उपाध्यक्ष रावेर यावल मतदार संघाचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांचे हस्ते व मा. प्रभाकर आपपा सोनवणे यांचे अध्यक्षते खाली अभियानाची सुरवात होणार आहे. हात से हात जोडो अभियानामध्ये प्रमुख उपस्थिती आमदार शिरीष चौधरी, माजी आ. रमेश चौधरी, हाजी शब्बीर खान, भगतसिंग पाटील,आर. जि.पाटील, नितीन चौधरी, लीलाधर चौधरी,शेखर पाटील, मारूळचे जावेद जनाब, धनंजय चौधरी इत्यादी पदाधिकारी उपस्थित राहणार असुन जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच नगरसेवक,शहर कॉग्रेस पदाधिकारी, तालुका कॉग्रेस पदाधिकारी, अल्पसंख्याक कॉग्रेस पदाधिकारी, एस. सी. विभाग पदाधिकारी, महिला कॉग्रेस पदाधिकारी, सेवा दल पदाधिकारी, युवक काँग्रेस पदाधिकारी यांनी उपस्थित राहून हात से हात जोडो अभियानामध्ये उपस्थित रहावे असे आवाहन यावल शहर कॉंग्रेस कमिटीचे कदीर खान व फैजपूर शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष रियाज शेख यांनी केले आहे .यावल ( प्रतिविधी ) येथील तालुका व शहर कॉग्रेस कमिटीचे “हात से हात जोड़ो” अभियानास सुरुवात होत असुन या अभियानास यशस्वी करण्यासाठी पक्षाच्या सर्व पदाधिकारी यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन कॉंग्रेस कमेटीच्या वतीने करण्यात आले आहे .

Related Articles

Back to top button
Don`t copy text!