Uncategorized

पिकविम्यासाठी रिसोडमध्ये (वाशिम) धडकला हजरो शेतकऱ्यांचा मोर्चा…

पिकविमा प्रश्नी मा.रविकांतभाऊ तुपकर व दामूअण्णा इंगोले यांची आक्रमक भूमिका…

वाशिम (ता.१९ जाने.) – शेतकऱ्यांना हक्काचा पिकविमा मिळावा यासाठी रिसोड तहसिल कार्यालयावर मा.रविकांतभाऊ तुपकर व दामूअण्णा इंगोले यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा प्रचंड मोर्चा निघाला, या मोर्चाला शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

एआयसी या विमा कंपनीने बुलढाणा,वाशीम जिल्हासह १६ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांनी प्रीमियमची रक्कम भरूनही प्रीमियमच्या तुलनेत अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात कंपनीने कमी रक्कम जमा केली. तर दुसऱ्या बाजूला अनेक शेतकरी नुकसान भरपाईस पात्र असूनही कंपनीने त्यांच्या खात्यात एक रुपयाही टाकलेला नाही. याच पार्श्वभूमीवर, एआयसी कंपनी आणि राज्य सरकारच्या विरोधात आपल्या संतप्त भावना घेऊन हजारो शेतकरी रिसोड शहरातील तहसील कार्यालयावर धडकले. शेतकऱ्यांचा हक्काचा पिकविमा मिळावा व अतिवृष्टीची नुकसान भरपाई तातडीने मिळावी, या मागण्या मा.रविकांत तुपकर यांनी तहसीलदार एस.एन.शेलार यांची भेट घेवून रेटून धरल्या. या मोर्चाचे आयोजन ‘स्वाभिमानी’चे विदर्भ प्रमुख दामूअण्णा इंगोले यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे यावर्षी प्रचंड नुकसान झाले पण दुर्दैवाने, अशा वेळेला शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी राज्य सरकार एआयसी कंपनीला पाठीशी घालण्याचे प्रयत्न करत आहे. एआयसी कंपनी आणि सरकारमध्ये साटंलोटं आहे, असा आमचा स्पष्ट आरोप आहे. आणि म्हणूनच या कंपनीवर कोणतीही कारवाई करण्यास सरकार धजावत नाही.

जर ३१ जानेवारी पर्यंत एआयसी कंपनीने शेतकऱ्यांच्या हक्काची पिकविम्याची रक्कम त्यांच्या खात्यात टाकली नाही व अतिवृष्टीची नुकसान भरपाई तातडीने मिळाली नाही, तर त्यानंतर मात्र राज्यात आक्रमक आंदोलनाचा आगडोंब उसळेल…!, असा इशारा मा.रविकांतभाऊ तुपकर यांनी यावेळी दिला…

Related Articles

Back to top button
Don`t copy text!