महात्मा जोतीराव फुले स्मृतीदीनानिमित्त अभिवादन कार्यक्रम

वाशिम : ( दि. २९ नोव्हेबर )
स्थानिक महात्मा जोतीराव फुले स्मारक चौकात ( दि. २८) रोजी महात्मा जोतीराव फुले स्मृतीदीनानिमित्त क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे पूजन आणि हार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी अभिवादन करण्यासाठी मोठ्या बहुजन समाजातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवनकार्यावर प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ सिद्धार्थ देवळे, जेष्ठ विचारवंत डॉ. रवी जाधव, इंजी. सीताराम वाशीमकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ.लीलाबाई रंधवे, रामप्रभू सोनोने, प्रल्हाद पाटील पौळकर ह्यांनी विचार व्यक्त केले.
यावेळी प्रामुख्याने गणेश भांदूर्गे, शंकर वानखेडे, संतोष वानखेडे, रामा इंगळे, सत्यशोधक समाजाचे जिल्हाध्यक्ष गजानन धामणे,अखिल भारतीय माळी महासंघ जिल्हाध्यक्ष गजानन ठेंगडे, माळी युवा मंच जिल्हाध्यक्ष नागेश काळे, उपाध्यक्ष महादेव हरकळ, कार्याध्यक्ष रामू गाभणे, शहराध्यक्ष वैभव उलेमाले, विठ्ठल ढगे, प्रशांत भडके, दीपक वानखेडे, गजू लांडगे, बबन भांदुर्गे, रामेश्वर गाभणे, भगवान मडके, बालाजी बगाडे, धनंजय वानखेडे, विठ्ठलराव इंगोले, इंद्रजित इंगोले, मदन धूमटकर, भगवान मडके, नारायण ठेगडे, शिरीष इंगोले, गणेश अनिल रंधवे, ह्यांचे सह अनेक मंडळी समाज बांधवाची प्रमुख उपस्थिती तसेच मिना बालाजी बगाडे, जनाबाई हात्रांगे, नंदा इंगोले, शोभाबाई इंगळे, पार्वताबाई वानखेडे, रेखा सोनीने, लक्ष्मी इंगळे, मंदा रंधवे, आरती इंगळे, नंदा काळे, वच्छला वानखेडे, कुसुम काळे, शशिकला इंगोले, सरस्वती वानखेडे, मीना लांडगे, वर्षा वानखेडे, दुर्गा इंगळे, शीतल इंगळे, ताराबाई, योगिता कणखर, रुपाली इंगळे, नलू इंगळे, ज्योती वानखेडे, शारदा जोगदंड, संगीता इथापे सह अनेक महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन राऊत तर आभार नागेश काळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माळी युवा मंचच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.