Uncategorized

अखिल भारतीय श्री संत सावता माळी युवक संघ अकोला जिल्हा संपर्क प्रमुख पदी रोशन भाऊ बोंबटकार यांची निवड

:-भांबेरी येथील सामाजिक कार्यकर्ते रोशन बोंबटकार हे नेहमीच आपल्या सामाजिक कार्यामुळे चर्चेत असतात.त्यांच्या याच सामाजिक कार्याची दखल घेऊन समाजसुधारक,स्त्री शिक्षणाचे जनक,महात्मा जोतीराव फुले व विद्येची देवता सावित्रीमाई फुले यांचा इतिहास जनसामान्यापर्यंत पोहचवणारी तसेच अनेक बहुउद्देशीय कार्यात आघाडीवर असणाऱ्या अखिल भारतीय श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य च्या अकोला जिल्हा संपर्कप्रमुख पदी श्री संत सावता माळी युवक संघ संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषण लोकनेते श्री सचिन भाऊसाहेब गुलदगड यांच्या आदेशाने व प्रदेशाध्यक्ष श्री जितेंद्र भाऊ महाजन आणि विभागीय अध्यक्ष
अजय भाऊ बंड यांच्या हस्ते रविराज भाऊ शेवलकार यांची अकोला जिल्हाध्यक्ष व रोशन भाऊ बोंबटकार यांची अकोला जिल्हा संपर्कप्रमुख पदी यांची नियुक्ती करण्यात आली आली. नियुक्ती पत्रात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जितेंद्र भाऊ महाजन यांनी म्हटले आहे की,महात्मा फुले यांचे आचार आणि विचार यांच्यावर संघटनेची मूलतत्त्वे आधारलेली आहेत.महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांचे कार्य,त्यांचे साहित्य,जनसामान्यांना वाचायला मिळावे,त्यांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी संघटना काम करत आहे. हे कार्य आणखी वाढविण्यासाठी रविराज भाऊ शेवलकार आणि रोशन भाऊ बोंबटकार यांनी प्रयत्न करावे तसेच संघटनेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा.

तसेच सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात चांगली क्रांती घडवून यावी यासाठी संघटना काम करत आहे.यामध्ये महिलांना व युवकांना आपली समाजामध्ये वेगळी छवी निर्माण करता यावी व प्रत्येक घटकाला योग्य तो न्याय मिळावा यासाठी संघटना अविरतपणे काम करत आहे.याद्वारे विविध उपक्रम या संघटनेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत.

तसेच श्री संत सावता माळी युवक संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दौऱ्यावर असताना त्यांनी बैठक बोलावून अनेक समाज बांधवांची भेट घेऊन संघटनेमध्ये काम करताना तसेच इतर समस्या बद्दल योग्य मार्गदर्शन केले.यावेळी विदर्भ विभागीय अध्यक्ष अजय भाऊ बंड, तेल्हारा तालुका अध्यक्ष प्रशांत भाऊ खाडे, गौरव भाऊ अढाऊ,विशाल भाऊ लहाने,राहुल भाऊ धनोकर,राहुल भाऊ मगरे व इतर अनेक समाज बांधव उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!