Uncategorized

भुजबळांना महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा भेट


मालेगाव .ता.27- अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदे पश्चिम विदर्भ यांच्या तर्फे माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांना। यवतमाळ येथील कार्यक्रमात महात्माा फुले व सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा देण्यात आली.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक रॉयल पॅलेस लोन येथे पार पडली या कार्यक्रमाला छगनराव भुजबळ उपस्थित होते यावेळी त्यांचा महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला यावेळी
यावेळी समता परिषदेचे पश्चिम विदर्भ विभागिय अध्यक्ष प्रा अरविंद गाभणे ,वाशिम जिल्ह्या अध्यक्ष संतोष गोमाशे ,यवतमाळ जिल्हा अध्यक्ष विनोद इंगळे ,आत्माराम जाधव ,कार्याध्यक्ष राजेंद्र घाटे ,कपील भालेराव ,अमरावती जिल्ह्या अध्यक्ष विपुल नाथे उपाध्यक्ष सेवाराम आडे, शिवाजी इंगळे ,अमोल गाभणे, रामदास सोनोने ,जावेद भवानिवाले आदी उपस्थित होते .
————;;;-
फोटो ओळीं – भुजबळ यांना प्रतिमा भेट देण्यात आली .

Related Articles

Back to top button
Don`t copy text!