Uncategorized

संविधान दिनाच्या कार्यक्रमात प्रबोधनासह कार्यकर्त्यांचा सत्कार


मंगरुळपीर:- दि.२६ नोव्हेंबर रोजी येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे भारतीय संविधान दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात संविधानाविषयी प्रबोधनासोबतच आंबेडकरी चळवळीत मोलाचे योगदान देणार्‍या जेष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे ऊदघाटन प्रसीद्ध हृदयरोग तज्ञ डाॅ.सिद्धार्थ देवळे यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सामाजीक कार्यकर्ते राहुलदेव मनवर हे होते. त्याचप्रमाणे प्रमुख ऊपस्थिती भदन्त महाकाश्यप, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हामहासचीव गोविंदराव इंगळे, संस्कारविधी प्रमुख हरिश्चंद्र पोफळे, आयोजक माजी ऊपसभापती गजानन इंगोले, प्रखर वक्ते बाळासाहेब डेरे, संजय आधारवडे, सरकार इंगोले, प्रा.संजय मनवर, बहुजन शिक्षक संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष अ.ल.मनवर, भा.बौ.म. तालुका अध्यक्ष प्रमोद बेलखेडे, विनोद भगत, रणजीत भगत, राजाभाऊ सरदार, प्रमोद भगत यांची ऊपस्थीती होती. सुरुवातीला डाॅ.बाबासाहेब आंबेडकर देशाला संविधान प्रदान करीत असल्याच्या प्रतिकृतीला अभिवादन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर आंबेडकरी चळवळीत मोलाचे योगदान देणार्‍या जेष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यामधे ऊत्तमराव इंगोले, सरकार इंगोले, बारकुजी खाडे, शालिग्राम चुंबळे, मधुकर सावळे, प्रल्हादराव इंगोले, नामदेवराव भगत, माजी सैनीक नंदू मनवर, जयराम भगत, तुकाराम इंगोले, तुकाराम खडसे, पुंडलीकराव भगत यांचा तसेच आयुष्यभर निळी टोपी परिधान करणार्‍या वामनराव भगत, प्रकाश ठोंबरे, वामनराव बेलखेडे, शालिकराम इंगोले, शालिकराम दंदे, दामोदर खाडे, सदाशीव आडोळे, भिकाजी खडसे, काशीराम भगत यांचेसह ईतरही जेष्ठ कार्यकर्त्यांचा डाॅ.सिद्धार्थ देवळे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर सामुहीकरीत्या संविधान ऊद्देशीकेचे वाचन करण्यात आले.
त्यानंतर आयोजक गजानन इंगोले यांनी प्रास्तावीक व्यक्त केले. तसेच डाॅ.सिद्धार्थ देवळे, राहुलदेव मनवर, हरिश्चंद्र पोफळे, गोविंदराव इंगळे, बाळासाहेब डेरे, प्रा.सुभाष अंबोरे, संजय आधारवडे, प्रा.संजय मनवर, प्रा.प्रफुल इंगोले यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले देशाचे संविधान विषयी मार्गदर्शन सखोल मार्गदर्शन केले. त्यानंतर भिमराव उपरवट गायन संच अकोला यांचा “ही संध्या बा भीमाची” प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे संचालन सुशीलकुमार मनवर यांनी केले. या कार्यक्रमाचा शैकडो महीला व पुरुषांनी मोठ्या ऊत्साहात लाभ घेतला.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!