Uncategorized

नवोदय सराव परीक्षेचा बक्षीस वितरण सोहळा थाटामाटात साजरा


मालेगांव ता 27 : मालेगाव येथील अकोला फाटा ,कंझरकर कॉम्प्लेक्स या ठिकाणी ओंकारगीर नवोदय व स्कॉलरशिप अकॅडमी मालेगांवच्या वतीने नवोदय तालुकास्तरीय स्पर्धा सराव परीक्षेचे आयोजन दि. 13 नोवेम्बर रोजी करण्यात आले होते व त्यानिमित्ताने या सराव परीक्षेमध्ये तालुक्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता .त्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण सोहळा अगदी थाटामाटात करण्यात आला.
यावेळी सर्वप्रथम परमपूज्य ओंकारगिर बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री विकास कंझरकर सर( सेवानिवृत्त मुख्याध्यापक ),तर प्रमुख पाहुणे म्हणून पावशे सर (सेवानिवृत्त प्राध्यापक), कपिल भालेराव( पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्त शिरपुर) , माधव बोरकर (अन्नपुरवठा विभाग ),निर्मलसिंग राठोड (अन्नपुरवठा विभाग) ,हर्षा दीदी, मदन मुठाळ ,अकॅडमी चे मार्गदर्शक सचिन चतरकर, अकॅडमीचे संचालक ओमराजे निंबाळकर उपस्थित होते.

  • आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये शिक्षण चा महत्त्वाचा केंद्र बिंदू म्हणून विद्यार्थी आहे .आजचा विद्यार्थी हा उद्याचा भावी देशाचा नागरिक आहे .याच विद्यार्थी कड़े पालकानी विशेष लक्ष देण्याची गरज आहे ,विविध स्पर्धा मार्फत आपले पाल्य घडविण्यावर विशेष भर द्यावा असे आवहान आपल्या अध्यक्षीय भाषणातून कंझरकर यानी या सत्कार समारंभ वेळी उपस्थित पालकाना केले.
    मालेगाव शहरातील अकॅडमीच्या वतीने तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी नवोदय सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे ,ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या मनातील भीती व परस्परांतील संभाव्यच चुका टाळण्यासाठी मालेगाव येथे तालुकास्तरीय सराव परीक्षा 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 1.00 दरम्यान परीक्षा घेण्यात आली होती,ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम बक्षीस मोबाईल, द्वितीय बक्षीस पाचशे रुपये, तृतीय बक्षीस स्टडी टेबल असे ठेवण्यात आले.यासह उर्वरित विद्यार्थी ना प्रमाणपत्र चे सुद्धा वाटप करण्यात आले. या बक्षीस वितरणामध्ये मयूर विष्णू पोपळघट, विनायक सुरेश राजगुरू, पद्मम न्यानेश्वर देवकर, संयम आशिष गोलेच्छा , हर्षा अशोक झळके ,श्रावणी मनोज खिल्लारी यांसहअनेक विद्यार्थ्यांना बक्षीस प्राप्त झाली ,तरी या सराव परीक्षेमध्ये जवळपास तालुक्यातील 250 विद्यार्थिनि सहभाग नोदविला होता.
    हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुमित इंगळे, जितेंद्र डोंगरदिवे ,भागवत सरनाईक, सचिन अवचार ,किशोर राऊत यांनी परिश्रम घेतले .तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी देशमुख व आभार प्रदर्शन ओमराजे निंबाळकर यांनी केले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!