एम .एस .जी .इंग्लिश स्कूलमध्ये संविधान दिन साजरा

शिरपुर ता 26 -ता येथील मातोश्री शालिनीताई गवळी इंग्लिश स्कूल मध्ये 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन निमित्त संविधानाचे विद्यार्थी कडून पठण करून हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातिला महामानव भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कपिल भालेराव ,तर प्रमुख पाहुने म्हणून कुंडलीक इरतकर ,प्रभाकर काळे ,अशोक जटाळे ,कैलास राजगुरू यासह पालक उपस्थित होते.त्यानंतर संविधान दिनाचे महत्व विद्यार्थी ना पटवून देण्यात आले. संविधान समितीने केलेल्या कार्याची माहिती यावेळी सांगण्यात आले .यावेळी संविधानाचे महत्त्व म्हणून विद्यार्थि गायत्री संतोष भालेराव, राजश्री कपिल भालेराव ,आरुषी विलास डाखोरे ,सार्थक राम गडदे, आयुषी जयंती इरतकर यांनी भाषणे दिली तर राजवीर सुर्वे हे डॉक्टर आंबेडकर व स्वराहंगे रमाबाई यांच्या भूमिकेत होत्या . यावेळी नारायण काळे स्वप्निल देशमुख ,वंदना सुर्वे आदी शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन रेखा देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन नारायण काले यांनी केले.