Uncategorized

सावंत तुम्ही शेतकऱ्यांशी बेईमानी करु नका महागात पडेल मा.आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचा इशारा

गुलाल आम्हीच लावलाय मला बुकाही लावता येतो हे विसरू नका

ऊस दराच्या मागणी साठी ज्ञानेश्वर पाटील यांच्या नेतृत्वाखाली परंडा येथे भैरवनाथ कारखान्याच्या विरोधात भव्य मोर्चा .

परंडा सुरेश बागडे दि.२७

परंडा मतदार संघाचे आमदार तथा जिल्हयाचे पालक मंत्री

तानाजी सावंत उस उत्यादक शेतकऱ्यांशी बेईमानी न करता शेजारच्या बाणगंगा साखर कारखाण्या प्रमाने उसाला दर द्यावा अन्यथा गुलाल आम्हीच लावला आहे आता बुकाही लावणार असा जोरदार हल्ला ज्ञानेश्वर पाटील यांनी मोर्चात बोलताना केला.

दि २७ ऑक्टोबर रोजी सावंत यांच्या सोनारी येथिल भैरवनाथ शुगर कारखान्या विरूध्द मागील गळीत हंगामाचा २४५० रुपयाचा दर देन्याच्या मागणी साठी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या नेतृत्वाखाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात होता या मोर्चात परंडा भुम वाशी तालूक्यातील शेकडो शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते .

या वेळी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी सावंत यांचा समाचार घेताना म्हणाले की मंत्री पदा साठी तानाजी सावंत यांनी गद्दारी करून जात बदलली आहे . ज्या शेतकऱ्यांनी तुम्हाला मोठे केले त्यांच्याशी गद्दारी खपवुन घेतली जानार नाही .

चालू गळीत हंगामाचा दर भैरवनाथ ने जाहिर करावा व मागील गळीत हंगामाचा २४५० चा दर देन्यात यावा अन्यथा पुढील मोर्चा थेट कारखान्यावर काडणार असुन कारखाना बंद पडल्यास सावंत स्वतः जबाबदार राहतील असा इशारा दिला आहे .

यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर , जिल्हा प्रमुख गौतम लटके , तालूका प्रमुख मेघराज पाटील , शहर प्रमुख इरफान शेख , शिवाजी मेहेर , जनार्धन मेहेर , सुभाष शिंदे , ज्ञानेश्वर गीते , चेतन बोरडे ,दिलीप शाळू , ईस्माईल कुरेशी , मैनुद्दीन तुटके , शंकर ईतापे, अब्बास मुजावर , हनुमंत कातुरे ,रईस मुजावर , रफीक मुजावर , सलीम मुजावर , शारूख मुजावर , सलीम मुजावर ,शंकर जाधव , भाऊ सुर्यवंशी , आप्पा गोडगे,अंकुश डांगे, प्रताप पाटील , दिपक गायकवाड , उपेश परदेशी , कुनाल जाधव , शिवाजी ठवरे , भालचंद्र पाटील , दिपक भापकर ,मानिक शिंदे , शिवाजी कासारे , बुध्दीवान लटके , सुरेश डाकवाले , दत्ता मेहेर , रंगणाथ देवकर , या मान्यवरा सह शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते .

Related Articles

Back to top button
Don`t copy text!