विटांचा ट्रक पलटी; १ ठार ३ जखमी
चालका विरुद्ध गुन्हा दाखल

शिरपूर :- चोहोटा बाजार येथून विटा घेवून गोभणी येथे विटा घेवून जात असलेला ट्रक दिनांक १५ मे २०२ रोजी सकाळ ६.१५ वाजताच्या दरम्यान चांडस फाट्याजवळ पलटी झाला ज्यामध्ये ट्रक मधील विटांवर बसलेले ४ मजूर विटाखाली दबल्या गेले त्यामधील नरेंद्र पुंजाजी बोबडे चा मृत्यू झाला तर इतर सतिश संजय आपोतीकर, देवानंद शालीकराम पाखरे, दिवाकर वासुदेव पाखरे हे जखमी झाले आहेत.
पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती नुसार मृतकाचा भाऊ अरुण पुंजाजी बोबडे याने शिरपूर पोलिसांत दिनांक १९ मे२०२२ रोजी फिर्याद दिली कि, दिनांक १४ मे २०२२ रोजी ट्रक चालक सतीश संजय आपोतीकर हा एम.एच.१६ ए.ई.९६२८ मध्ये विटा घेवून गोभणी येथे जाण्यासाठी रात्री १० वाजता दरम्यान निघाला परंतु १५ मे २०२२ रोजी सकाळी ६.१५ दरम्यान चांडस फाट्याजवळ चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या खाली जावून पलटी झाला. ट्रक मधील विटांवर बसलेले मजूर विटाखाली दबल्या गेले त्यामधील नरेंद्र पुंजाजी बोबडेचा मृत्यू झाला तर सतिश संजय आपोतीकर, देवानंद शालीकराम पाखरे, दिवाकर वासुदेव पाखरे हे जखमी झाले आहेत. चालकाने भरधाव वेगात वाहन चालवल्याने त्याचेवर कारवाई व्हावी अशा आशयाच्या फिर्यादी वरून शिरपूर पोलिसांनी भा.द.वी कलम ५२४ नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ए.एस.आय. प्रकाश सरनाईक करीत आहेत.