Uncategorized

पारसबाग येथे साकारतेय १०८ फुट उंचीचे भव्य चतुर्भुज मंदिर!


सात एकरात साकारतेय दीडशे कोटींचे जिणालय संगमरवरच्या कलाकुसरीत मग्न साडेचारशे कारागीर

शिरपूर होणार धार्मिक पर्यटनाचे ‘रोलमॉडल’

जलमंदिरात ठेवण्याकरिता २३ फुटाची भव्य मूर्ती विशेष आकर्षण

जल मंदिर

श्रीक्षेत्र शिरपूर जैन : (गोपाल वाढे)
: शिरपूर जैनांची काशी म्हणून संपूर्ण देशात प्रख्यात आहे. अंतराळात बसलेली भगवान पार्श्वनाथाची मूर्ती व इतर जैन मंदिरांसाठी प्रसिद्ध असलेल्या या तीर्थस्थळाला भेट देण्यासाठी संपूर्ण जगातून भाविक येतात. याच पुरातन नगरीत अंतरिक्ष पार्श्वनाथ श्वेतांवर ट्रस्ट आणि जैन तिर्थरक्षा ट्रस्ट यांच्या मार्फत सात एकराच्या पारसबागेत दोन एकरावरील १०८ फुट उंचीचे शुभ्र विशालकाय चर्तुमुख जिणालय घडविण्यासाठी गेल्या नऊ वर्षा पासून विविध राज्यातून साडेचारशे कारागीर अहोरात्र झटत आहेत. संगमरवरचा आग्र्याचा ताजमहाल जागतिक पर्यटनाचे केंद्रबिंदू ठरला. प्रेमाचे प्रतिक असलेल्या या ताजमहालापेक्षाही सरस धवल श्रीमंतीचे जिणालय शिरपुर गावात साकारत आहे.
पासरबाग परिसरात भव्य भक्तनिवास, भोजनशाळा, विविध कार्यक्रमासाठी सभामंडप, जलमंदिर, आदी कामे कही प्रमाणात पूर्ण झाले असून जलमंदिर तथा चतुर्भुज मंदिराचे काम प्रगतिपथावर आहे. जैनमुनीश्री विमलहंस विजयजी महाराज यांच्या मार्गदर्शनात सदर कामे वेगाने होत आहेत. यासाठी राजस्थान, ओडिसा, भिलवाडा आग्रा येथील साडेचरशेच्या वर कारागीर आकार देत आहेत. पांढऱ्याशुभ्र दगडापासून साकारत असलेले हे मंदिर संपूर्ण देशात धार्मिक पर्यटकांचे श्रद्धास्थान व आकर्षण ठरणार आहे. अमदाबाद, मुंबई, सूरत, राजस्थान तसेच देशविदेशातील जैन बांधवांच्या देणगीतून हे जिल्ह्याचे भूषण आकार घेत आहे. त्याच बरोबर या विशाल परिसरातील कामासाठी शिरपूर परिसरातील मोठा कामगार वर्ग रोजगाराला लागला आहे. त्यामुळे अनेकांच्या हाताला काम मिळाले असून कामाचा वेगही वाढला आहे. तर देशभरातील पर्यटक हे काम पाहण्यासाठी नियमित येत आहेत. ३० वर्षापासून अंतरिक्षपार्श्वनाथ मंदिर सिलबंद असल्याने भाविकांत पसरलेली निराशा व शिरपूरकडे त्यांचा ओढा कमी झाला होता. मात्र आता देशभरातील जैन भाविक येथे मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. त्यामुळे शिरपूर येथील छोटे मोठे व्यवसाय देखील वाढण्यास मदत होणार आहे.

जलमंदिरात ठेवण्याकरिता २३ फुटाची भव्य मूर्ती

या पारसबाग परिसरातच जलमंदिराची निर्मिती करण्यात आली आहे. जलमंदिरात ठेवण्याकरिता भव्य अशी २३.५ फुट उंच म्हणजेच २८१ इंच उंच मुर्तीचे काम देखील सुरू आहे. त्यासाठी पाषाण २६ फुट उंच १६ फुट रूंद ९ फुट लांब आकाराची सलग काळ्या पाषाणाची शिळा जीचे वजन १२० टन एवढे आहे. अशी सुरक्षितपणे भिलवाडा येथून एक हजार किलोमिटरचा प्रवास करीत शिरपूर येथे ट्रकद्वारे आणण्यात आली. या ग्रेनाईटच्या दगडापासून पार्श्वनाथ भगवंताची अर्धपद्मासनास्थ मूर्ती आकार घेत आहे, पासरबाग परिसरातील संपूर्ण पाणी हे वॉटर हार्वेस्टींगद्वारे जलमंदिरात साठविण्याचे काम केले जाते. येथील थोडेही पाणी वाया जावू दिले जात नाही. तर येथील कामातून निघालेले दगडाचे तुकडे सुद्धा विविध कामासाठी उपयोगात आणल्या जातात. तर परिसरातील शेतात मोठ्या आकाराचे दगड जे की शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये अडसर ठरतात त्यावर देखील नक्षीकाम करून ते दगड जलमंदिरच्या कामासाठी वापरले जात आहेत. एकंदरीत जैन मुनी गुरुदेव विमलहंस विजयजी महाराज व गुरूदेव प्रत्यास परमहंस विजयजी महाराज यांच्या प्रेरणेने सर्व काम पूर्णत्वास जात आहे. पारसबाग परिसरातील संपूर्ण काम झाल्यानंतर हे अतिशय सुंदर असे पर्यटन स्थळ निर्माण होईल. मात्र हे काम चालू असताना पहायला येणाऱ्या पर्यटकांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. येथे विविध धर्मिय कार्यक्रम देखील होत असतात. त्यात शिरपूर येथील भजनीमंडळाचा देखील सहभाग असतो. येथील सकल देशभरातील भाविक दाखल होत आहेत. त्यांचा या कामाकरिता मोठा सहभाग व सहकार्य होत आहे.

शासन मात्र उदासीन
जागतिक पर्यटनस्थळ ठरावे, या दर्जाचे हे तीर्थक्षेत्र शासनाच्या लेखी मात्र दुर्लक्षित आहे. रस्ते, इतर मुलभूत सुविधांची वानवा आहे. अतिक्रमणाने रस्ते अरुंद झाले आहेत. त्यामुळे भाविकांची गैरसोय होते, धार्मिक पर्यटनातून कोटयवधी रुपयांचे उत्पन्न देणारे ही नगरी प्रशासनाच्या लेखीमात्र दुर्लक्षित राहिली आहे.

शिरपूर जिणालयाचे प्रस्तावित चित्र

Related Articles

Back to top button
Don`t copy text!