Foods

ब्रोकोली या भाजीपाला पिकाचे यशस्वी उत्पादन

वाशीम जिल्ह्यातील प्रथम प्रयोग


शिरपूर :-
गौळखेडा (शिरपूर) येथील प्रयोगशील अत्यल्प भूधारक शेतकरी गजानन तुळशीराम वानखेडे यांनी जिल्ह्यात प्रथमच आपल्या शेतात ब्रोकोली पिक यशस्वी पणे घेवून वाशीम जिल्ह्यात प्रथमच व्यापारी तत्वावर असे पिक घेण्याचा मान मिळवला आहे.
वानखेडे यांच्याकडे वडिलोपार्जित एकूण २ एकर शेती आहे. ज्यामध्ये ते पारंपारिक पिके न घेता नेहमी वेग वेगळे प्रयोग करीत असतात. शेतामध्ये त्यांनी स्व खर्चाने विहीर खोदली असून विविध भाजीपाला पिके घेण्यास सुरुवात केली, राष्ट्रीय कृषी विकास शासकीय योजनेतून १० गुंठ्ये शेती मध्ये पॉली हाऊस असून, विहिरीवर मुख्यमंत्री सौर उर्जा योजनेतून सौर पंप बसवला आहे. आपल्या २ एकर शेतीमध्ये त्यांनी छोटे छोटे प्लॉट टाकून एकाच वेळी विविध प्रयोग करीत पारंपारिक पिका व्यतिरिक्त अनेक पिके जसे बिजवायीचा कांदा, खपली गहू, उन्हाळी मुंग, वांगे, टमाटे, मिर्ची, शिमला मिर्ची, भाजीपाला रोपवाटिका आणि आता जिल्यातील पहिलाच पिक म्हणजे ब्रोकोली सुद्धा यशस्वी रित्या घेवून दाखवले आहे. अशा प्रकारची विविध पिके घेवून वानखेडे हे आपल्या २ एकर शेतात वार्षिक ५ लाखाच्या जवळ पास उत्पन्न घेतात जे कि पारंपारिक पिकांच्या तीन ते चार पट जास्त आहे.


फ्लावरसारखीच दिसणारी हिरव्या रंगाची ब्रोकोली ही भाजी आजकाल भारतीय बाजारपेठांमध्ये सहज उपलब्ध होते. दोघांची चव वेगवेगळी आहे. पण आपल्यापैकी अनेकांना ब्रोकोली म्हणजे हिरव्या रंगाचा फ्लॉवरच वाटतो. पण परदेशातून आलेली ही भाजी ब्रोकोली आणि फ्लॉवर या दोन्ही एकाच प्रकारातील भाजी आहे. मात्र त्यामधील पोषणद्रव्य ही थोड्या फार फरकाने सारखीच आहेत फक्त त्याचे प्रमाण बदलते. ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि के घटक असतात. तसेच कॅल्शियम, आयर्न, मॅग्नॅशियम, फॉस्फरस घटक फ्ल्वॉवरपेक्षा थोडे अधिक असतात.या भाज्यांमध्ये डाएटरी फायबर्स आणि अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक आढळतात. फ्ल्वॉवर आणि ब्रोकोलीमध्ये पोटॅशियम घटक मुबलक असल्याने हृद्यविकाराच्या रुग्णांसाठीही फायदेशीर आहे. फायबर घटक अधिक असल्याने पचन सुधारायला मदत होते तसेच वजन घटवण्यासही फायदेशीर ठरतात. पण ब्रोकोली की फ्ल्वॉवर यापैकी ब्रोकोली अधिक फायदेशीर आहे. त्यामध्ये पोषक गुणधर्म अधिक आहेत.१)शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांवर आधारित न राहता वेग वेगळी पिके घेवून पाहण्याचा प्रयत्न करावा, यामध्ये यश आल्यास नक्कीच शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होते. वेगवेगळी पिके घेण्यापूर्वी मी कृषी विभागाच्या विविध अधिकारी आणि तज्ञ लोकांशी चर्चा करून मार्गदर्शन घेतलेले आहे. – शेतकरी गजानन वानखेडे – ८४५९३३१०१६
२) आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये व्यावसायिक तत्वावर प्रथमच यशस्वी रित्या ब्रोकोली या पिकाचे उत्पादन गजानन वानखेडे यांनी घेतले असून या मध्ये त्यांनी खूप मेहनत केली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे बागायती सोय आहे त्यांनी कृषी विभागामार्फत असलेल्या योजनांमधून पॉली हाऊस, शेडनेट घेवून त्या माध्यमातून मोठ मोठ्या हॉटेल्स मध्ये मागणी असलेल्या अशा प्रकारच्या विदेशी भाज्या आणि फळपिके घेतल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडेल.- डी.ए.कंकाळ – प्रभारी तंत्र अधिकारी, जिल्हा आधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय वाशीम

फोटो कॅप्शन :- गजानन वानखेडे यांच्या शेतातील ब्रोकोली पिकाची पाहणी करतांना मनोहर ठाकरे कृषी सहाय्यक शिरपूर

Back to top button
Don`t copy text!